Home संपादकीय २०२५ सरत्या वर्षाला निरोप देतानाच,२०२६ नववर्षाचे स्वागत करुयात…… पण काय कमावलं आणि...

२०२५ सरत्या वर्षाला निरोप देतानाच,२०२६ नववर्षाचे स्वागत करुयात…… पण काय कमावलं आणि काय गमावलं याचाही घेऊयात आढावा!

70

आशाताई बच्छाव

1002361025.jpg

२०२५ सरत्या वर्षाला निरोप देतानाच,२०२६ नववर्षाचे स्वागत करुयात……
पण काय कमावलं आणि काय गमावलं याचाही घेऊयात आढावा!
वाचकहो,
२०२५ सरत्या वर्षाच्या उत्तरार्धात “काय कमावलं आणि काय गमावलं” याचा हिशोब करायचा बसलोत तेव्हा २०२५ या वर्षाचा आढावा नजरेसमोर मांडताना अनेक गोष्टी नजरेसमोर तरळून गेल्यात.या वर्षात काही सुख दुःखाचे प्रसंग जवळून बघितले.तर अत्यंत वाईट व संघर्षाना तोंड देत या वर्षाची वाटचाल बिकट व काटेरी ठरली.अपवादात्मक सुखाचे प्रसंग आलेही मात्र त्याने आम्ही कधीच हुरळून गेलो नाहीत.आमची धडपड आणि वाटचाल हि केवळ आपल्याच आशिर्वादाने व पाठबळावर सुरू असल्यामुळे आम्ही २०२५ या सरत्या वर्षालाही अगदी धाडसाने सामोरे जाऊन आमच्या कार्याची अवघड वाटचाल सहज सुलभरित्या निभावून नेली.तसं तर आम्हाला संघर्षाची परंपरा अगदी बालपणापासूनच आहे.आमच्या रक्तातच अन्यायाविरुद्ध प्रखर चीड व डोळ्यात राग आहे, म्हणूनच संघर्षाचा वारसा आम्हाला अगदी बालपणापासून लाभला आहे.आजवरची वाटचाल करीत असताना आम्ही फक्त एकच ध्येय बाळगले.”जे जे आपणाशी ठावे,ते इतरांशी सांगावे शहाणे करूनी सोडावे सकळ जन!” या उक्तीप्रमाणे आम्ही आमच्या सहवासात व सानिध्यात आलेल्या अनेकांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहून कर्तृत्ववान बनविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत.हे विशेष रुपाने येथे नमूद करणे आवश्यक ठरते.
त्याशिवाय “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,देव तेथेची जाणावा.” या संत वचनानुसार आम्ही वाटचाल करीत असताना अठरा पगड जातीधर्माच्या बारा बलुतेदाराना सोबत घेऊन प्रत्येकाच्या हक्काच्या लढाईत निर्भिडपणे उभे राहून लढलो आहोंत.मग तो मनमाड येथील दलित कुटूंबाचे घर बळकावण्यांविरूध्द लढा असेल, किंवा मालेगावात संस्थेच्या नावाखाली खाजगी घरे हडपण्याचा डाव असेल तो आम्ही सपशेल उधळून लावला आहे.तर मालेगावच्या झाडी गावांतील दलित महिलेच्या शेतजमिनीचा प्रश्न असो आम्ही तेथेही न्यायच मिळवून दिला आहे.शिवाय सटाणा तालुक्यातील मांगीतुंगी भिलवाड गावच्या असंख्य आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी लढा देऊन त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला.तर रोझे गावच्या भ्रष्ट ग्रामसेविकेला हकालपट्टी करण्यासाठी दिलेला लढा व्यशस्वी करून दाखविला.येवला तालुक्यातल्या पुरणगाव येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांचा चेहरा जनतेसमोर उघडा केला.आणि सगळ्यात मोठा संघर्ष व-हाणे येथील जागा प्रश्नावर सुमारे पाच वर्ष योग्य त्या पुराव्यासह पुर्ण शक्तीनिशी लढल्यामुळे तेथील प्रकरणात यश प्राप्त झाले आहे.आम्ही हे सगळे करीत असताना कुठेही पैश्याची अपेक्षा केली नाही.किंवा कुणाशी हातमिळवणी केली नाही, त्यामुळेच आजही आमच्याकडे कुठलाही बँकबँलन्स नाही किंवा गैरव्यवहाराने कमावलेली हरामाची संपत्ती नाही.आजही आम्ही निराश्रितच आहोत.स्वतच्या मालकीचे घरही नाही.याचे मुख्यत्वे कारण म्हणजे आम्ही ज्याच्यांही सोबत उभे राहून लढलोत अगदी प्रामाणिकपणे लढलोत.गद्दारी किंवा लाचारी कधी स्विकारलीच नाही.फक्त लढत राहिलोत.आता गत दोन महिन्यांपूर्वी आम्ही आँक्टोबर महिन्यात वयाची चौपन्नावी गाठली मात्र या प्रवासात अनेक सुख दुःखाचे अनुभव आलेत.आम्ही ज्यांना अगदी जीवापाड जपले अशाही काही व्यक्ती दुर निघुन गेल्याचे शल्य जरी असले तरी अगदी स्वाभाविकपणे व प्रामाणिकपणे सन २०२६ या वर्षात पुन्हा संघर्षात्मक वाटचाल करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.म्हणूनच आम्ही सदैव एकच मुलमंत्र जोपासला आहे,”जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,देह झिजविती परोपकारे” या उद्देशानेच आता आमची वाटचाल सुरू राहणार आहे.एव्हढेच यानिमित्ताने!
राजेंद्र पाटील राऊत संस्थापक अध्यक्ष युवा मराठा महासंघ महाराष्ट्र, संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे, संस्थापक अध्यक्ष लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना महाराष्ट्र, मुख्य संपादक युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल महाराष्ट्र 

Previous articleमराठ्यांची वाघीण – शालिनीताई पाटील यांचे दुःखद निधन
Next articleYuva-Maratha-21-Dec-to-27-Dec-2025
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.