Home गडचिरोली मौजा गोविंदपूर येथे कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ — मा. हेमंत बोरकुटे यांच्या...

मौजा गोविंदपूर येथे कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ — मा. हेमंत बोरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली

106

आशाताई बच्छाव

1002310516.jpg

मौजा गोविंदपूर येथे कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ — मा. हेमंत बोरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:मौजा गोविंदपूर येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या भव्य उद्‌घाटन सोहळ्याने संपूर्ण गावात उत्साहाचे वारे वाहू लागले. या स्पर्धेचे उद्घाटन मा. हेमंत बोरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत दिमाखात पार पडले. ग्रामीण भागातील खेल संस्कृतीला चालना देण्याची व युवांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची त्यांची धडपड या स्पर्धेतून ठळकपणे जाणवली. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून माजी आमदार मा. नामदेवराव उसेंडी यांनी उपस्थित राहून युवा पिढीमध्ये शिस्त, संघभावना आणि क्रीडासंस्कृती वाढवण्याचा संदेश दिला. सहउद्‌घाटक म्हणून विलास पाटील भांडेकर यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

दीपप्रज्वलनाचा मान
छब्बूताई मोरेश्वर भांडेकर, आकाश सातपुते आणि येमाजी पिपरे सर
यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यांच्या हस्ते पेटवलेल्या दीपज्योतीने कबड्डी स्पर्धेला ऊर्जा, उत्साह आणि मंगल वातावरण लाभले.

प्रमुख अतिथी म्हणून
मोरेश्वर भांडेकर, लोमेश कोहळे, राजू पाटील, किरणताई चचाने, गीताताई सोमणकर तसेच उपसरपंच प्रीतम गेडाम
यांनी उपस्थित राहून खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन दिले.

या संपूर्ण आयोजनातून हेमंत बोरकुटे यांचे खेळाडूविषयीचे प्रेम, सामाजिक बांधिलकी आणि युवकांना सकारात्मक दिशेने नेण्याचा दृढनिश्चय स्पष्टपणे जाणवत होता. त्यांच्या नेतृत्वानेच ही स्पर्धा एक वेगळाच उत्सव बनून गावकर्‍यांच्या मनात आनंदाचा झरा उघडला.

खेळाडू, मान्यवर आणि गावकऱ्यांच्या सहभागामुळे ही कबड्डी स्पर्धा केवळ एक क्रीडा कार्यक्रम न राहता सामाजिक ऐक्य, एकोप्याचा आणि प्रगतीचा सुंदर सोहळा ठरली.