Home मुंबई शाहिरी लोक कला मंचा तर्फे नवीन कार्यकारणी मध्ये स्वारीता पाटकर यांची नियुक्ती.

शाहिरी लोक कला मंचा तर्फे नवीन कार्यकारणी मध्ये स्वारीता पाटकर यांची नियुक्ती.

92

आशाताई बच्छाव

1002234974.jpg

शाहिरी लोक कला मंचा तर्फे नवीन कार्यकारणी मध्ये स्वारीता पाटकर यांची नियुक्ती.

मुंबई 🙁 प्रतिनिधी विजय पवार )
शाहिरी लोककला जुन्या कडून नव्याकडे नेण्याचा संकल्प करीत मुंबईत आपल्या शाहिरी लोककलेचा ठसा उमटविणाऱ्या शाहिरी लोक कला मंचच्या नेतृत्वात सर्वानुमते बदल करून,मंचची धूरा ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मंचची सर्वसाधारण सभा परेल येथे होऊन,खेळीमेळीच्या वातावर णात ही नेतृत्व बदलाची निवड पार पडली.सभेचे अध्यक्षस्थान मावळते अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण यांनी संभाळले.
जुने-जाणते शाहीर मधु खामकर त्यांच्याकडे सेक्रेटरीपदाची, आणि जुन्या काळातील गिरणी कामगार संगीतकार महादेव खैरमोडे यांच्याकडे खजिनदारपदाची पुन्हा जबाबदारी सोपविण्यात आली. उपाध्यक्षपदी रविंद्रनथ पारकर,सल्लागारपदी शाहीर शांताराम चव्हाण, लोककलेतील प्रसिद्ध संगीतकार मनोहर गोलांबरे आणि अनुभवी शाहीर दत्ता ठुले यांची निवड करण्यात आली,तर उपसेक्रेटरी म्हणून स्वरिता पाटकर आणि समन्वयक म्हणून प्रसिद्ध नृत्यांगना सुरेखा काटकर यांची निवड करण्यात येऊन जुन्या-नव्याचा चांगलाच मेळ साधण्यात आला आहे.त्यावेळी सामाजिक क्षेत्रातील “स्टार महाराष्ट्र” हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल स्वरिता पाटकर यांचा आणि निगर्वी,समंजस व्यक्तीमत्वाची नेतृत्वपदी निवड झाल्या बद्दल काशिनाथ माटल यांचा पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला.
सांस्कृतिक कलाक्षेत्रातील कलाप्रेमी सुभाष जाधव मुख्यअतिथी म्हणून उपस्थित होते.