Home वाशिम वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमास ‘मृत्यूपर्यंत...

वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमास ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’

269

आशाताई बच्छाव

1002164221.jpg

वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमास ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनेवर जरब बसविणारा ऐतिहासिक निकाल दिला आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय – ३ वाशिम एम. एस. सहस्त्रबुद्धे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावत पीडीतेला न्याय दिला आहे.
पंचशील नगरमधील विजय उर्फ भोलाराम बरखाम ह्या आरोपीने पीडितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेने वाशिम हादरले होते. ह्या प्रकरणात आरोपीने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. ह्याप्रकरणी वाशिम पोलीस स्टेशनला ३४३/२०२४ नुसार तक्रार दाखल झाली होती. तत्कालीन तपास अधिकारी एपीआय श्रीदेवी पाटील यांनी तपास करून न्यायालयात विशेष बाल खटला क्रमांक ५०/२०२४ नुसार प्रकरण न्यायप्रविष्ट केले. तपास यंत्रणेचे पुरावे व पिडीतेची बाजू प्रभावीपणे मांडत सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर (व्यास) यांनी प्रकरणाची क्रुरता व दाहकता न्यायालयासमोर आणली. सर्व तपासातील पुरावेअंती जिल्हा व सत्र न्यायाधीश -३ एम. एस. सहस्त्रबुद्धे यांनी आरोपीच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त करीत समाजात महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर संदेश देण्याची गरज अधोरेखित केली. ह्या निकालात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलम ६ नुसार गंभीर लैंगिक अत्याचारासाठी आजन्म कारावासाची शिक्षा आणि वीस हजार रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद) तसेच भांदवी कलम ३६३ नुसार ५ वर्षे कारावासाचे शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना साधी कैद) ची शिक्षा सुनावली. ह्या महत्त्वाच्या खटल्यात तपास अधिकारी एपीआय श्रीदेवी पाटील यांनी बारकाईने तपास करून ठोस पुरावे जमा केले. सरकारी अभियोक्ता माधुरी मिसर (व्यास) यांनी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. कोर्ट पैरवी म्हणून पी.सी. सतीश बांगर यांनी काम पाहिले.

Previous articleसाक्री तालुक्यात नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी
Next articleमहत्त्वाचे निवडणूक २०२५-२६ उमेदवार बांधवांनो लक्ष द्या!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.