आशाताई बच्छाव
कार्तिक मास एकादशी पुणे,सूर्यकांत भोर- आम्ही लहान असताना साधारणतः 1975 1976 चा काळ असेल त्याकाळी आम्ही देहू गावी एकादशीसाठी व बार्शीसाठी जात असत तुमचे वडीलधारी माणसे नारायण बुचडे ठकण भाऊ भोर तुकाराम सुतार दत्तात्रय बोत्रे माणगावचे पालखी अशी सर्व मंडळी बैलगाडी घेऊन देहू गावी एकादशी व बारस या कार्यक्रमात जात असे त्याकाळी शेतीतील पिकातील भात पीक जोमत यायचं सुगीचे दिवस चालू झाल्यानंतर आमच्या कडील शेतकरी शेतातील तांदूळ एकादशीसाठी पाहिलीदोन पाहिल्या तांदूळ व वर्गणीसाठी पन्नास रुपये काढून ही पंगत देहू गावी देत असत त्याकाळी प्रवासाची साधने नसत आपली स्वतःची बैलगाडी घेत असत व आपल्या घरातील मंडळी घेऊन मुक्कामी देऊ गावी जात असत मुक्कामी राहिल्यानंतर एखाद्या महाराजांचे कीर्तन होत असत व बारस सोडून सर्व भक्तजन बैलगाडी ने परतीचा प्रवास करत आपापल्या घरी जात असे बार्शीचा सोहळा खरोखरच आनंदाचा आणि मजेशीर होता परंतु आता काळ बदलला काळा बरोबर माणसे बदलली गावात आयटी पार्क आल्यामुळे गावातील अर्थकरण बदलले व पैसा येऊ लागला त्यामुळे देहू ला जाऊन बारस घालण्याचे परंपरा लोप पावली सर्वांना वाटत असेल परंतु आमच्या गावात श्री विठ्ठल मंदिरात त्याच उत्साहात त्याच जोमात बार्शीचा कार्यक्रम आमची तिसरी पिढी करत आहे संतोष नारायण बुचडे हनुमंत ठकसेन भोर वसंत किसन भोर बाळू भोर दत्तात्रय सुतार नवनाथ कवडे सागर जगताप असे 14 जना मधून या बार्शीचा कार्यक्रम आयोजित केला होता पूर्वी या मंडळींनी ही प्रथा चालू ठेवली होती तसेच आताही प्रथा आमच्या गावातील विठ्ठल मंदिरात रविवार दिनांक २/११/२५ रोजी ह भ प ऋषिकेश महाराज चोरगे यांचे कीर्तन ठेवले होते चोरगे महाराजांनी काकडा का करावा व काकड आरती काकडाचे महत्व कसे असते हे त्यांनी समजून सांगितले काकडा हा आईचा उदरातील व भक्तिसरातील काकडा असे सविस्तर वर्णन केले काकड्याचे अभंग त्याची क्रम त्यांनी समजून सांगितले प्रथमता मंगलचरण त्यानंतर भूपाळी काकडा वासुदेव अशी सविस्तर माहिती यांनी दिली त्यानंतर त्यांनी दिवाळीचे सणाचे महत्व रमा एकादशी वसुबारस बाल प्रतिपदा लक्ष्मीपूजन भाऊबीज याचेही सविस्तर वर्णन केले तसेच काळभैरवनाथ यांचे सविस्तर आख्यान वर्णन केले काळभैरव काशीवरून कोठे कसे कधी केव्हा आले त्यांना शेत्रफळ का म्हणायचे सिद्धनाथ का म्हणायचं त्यांची बायको कोण त्यांची बहीण कोण थोडक्यात त्यांनी काळभोर नाथांचा भक्तिसार कथासारच सांगितला असे श्रवणीय कीर्तन चोरगे महाराजांचे झाले त्यानंतर पहाटे चार वाजता काकडला सुरुवात झाली व काकडा झाल्यानंतर पूर्वपर चालत आलेली रीत व परंपरा पंगत देऊन बारस सोडण्याची परंपराअजूनही तशीच ठेवली आहे राम कृष्ण हरी






