Home गडचिरोली _भाजप गडचिरोली शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न — आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर...

_भाजप गडचिरोली शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न — आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा_

94

आशाताई बच्छाव

1002153598.jpg

_भाजप गडचिरोली शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न — आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा_
———————————–
माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती.._

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली अंतर्गत गडचिरोली शहर कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज गडचिरोलीतील कर्तव्य कक्ष कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या बैठकीस भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रमुख तथा समन्वयक श्री. संजयजी फांजे, माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते डॉ. नामदेवराव उसेंडी, समन्वयक प्रमोद पिपरे, कि.मो.प्र. सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,जिल्हा महामंत्री गीताताई हींगे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा योगिता पिपरे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्यासह शहरातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत आगामी नगर पालिका व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा व मंथन करण्यात आले.

बैठकीचा समारोप करताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यांत होण्याचे संकेत आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद निवडणुकांचे वारे सर्वत्र लागले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय निश्चित करण्यासाठी कार्यकर्ता हा पक्षाचा खरा गाभा आहे. कार्यकर्ता हेच संघटनेचे बळ आहे. त्यांच्या मनातील ऊर्जा जागृत करून कार्यकर्त्यांकडून मतचाचपणी सुरू आहे. संघटनेची ताकद वाढवून आपण निश्चितच यश मिळवू,” असे मत डॉ. नेते यांनी व्यक्त केले.

बैठकीच्या यशस्वी आयोजनामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.