आशाताई बच्छाव
पहेलाआठवडी बाजारात केलेल्या माती कामाचा अंदाजपत्रकात
ग्रामपंचायत कार्यालय पहेला यांनी माहितीच्या अधिकारात दिली निरंक माहिती
सामाजिक कार्यकर्ते वसंता लोंदासे यांच्याशी पत्रकार संजीव भांबोरे यांनी केलेली बातचीत
संजीव भांबोरे
भंडारा-दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी सामाजिक कार्यकर्ते वसंता लोंदासे पहेला यांची पत्रकार संजीव भांबोरे यांनी भेट घेऊन आठवडी बाजारात केलेल्या माती कामाचा अंदाजपत्रकाबाबत चर्चा केली. सविस्तर वृत्त असे की, सामाजिक कार्यकर्ते वसंता लोंदासे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये 9 सप्टेंबर 2025 ला ग्रामपंचायत येथे माहितीच्या अधिकारांतर्गत आठवडी बाजारात केलेल्या माती कामाच्या अंदाजपत्रकाविषयी माहिती मागितली होती .त्यात प्रामुख्याने आठवडी बाजारात केलेल्या माती कामाच्या अंदाजपत्रक उपलब्ध आहे काय? त्यावर उत्तर अंदाजपत्रक उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले, गोसे विभागाकडून बाधित क्षेत्रात काम करण्याचे मंजुरी पत्र आहे काय? त्यावर मंजुरी पत्र प्राप्त नसल्याचे सांगण्यात आले, माती खोदकाम केलेल्या जागेचे लिचे पत्र, त्यावर लिजचे पत्र कार्यालयात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले, किती ट्रॅक्टर माती आणली ते रॉयल्टी पावत्या रॉयल्टी पावत्या! उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले ,आपण ज्या कंपनीला ई टेंडर दिले त्याचे मंजुरी पत्र ! ई टेंडर चे मंजुरी पत्र उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले .म्हणजे माहितीच्या अधिकार पत्रकात जी पाच प्रश्न विचारण्यात आली होती त्या पाचही प्रश्नाचे उत्तर ग्रामपंचायतने निरंक दिले. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की ,ग्रामपंचायत आठवडी बाजारात जवळपास 1000 ट्रॅक्टर माती टाकण्यात आली ती कुठून टाकण्यात आली? त्याच्या नेमका ठेकेदार कोण! ग्रामपंचायत की! अन्य? असा प्रश्न गावात चर्चेच्या विषयी आहे. ही नेमकी माती आली कुठून ?ही माती टाकण्यात कुणी खर्च केला? सामाजिक भावनेने माती टाकली का? मग सामाजिक भावनेने माती टाकली असेल तर त्यांनी आपलं नाव समोर का केले नाही ?असा अनेक प्रश्न निर्माण होतात. वरील प्रकरणात नेमकं कोण जबाबदार आहे! त्यावर कारवाई झाली पाहिजे? अशी सर्वसामान्य लोकांची मागणी आहे.






