Home नांदेड शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत कर्ज खात्‍यात वळती करु नये : जिल्हाधिकारी राहुल...

शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत कर्ज खात्‍यात वळती करु नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले.

65

आशाताई बच्छाव

1002034284.jpg

शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत कर्ज खात्‍यात वळती करु नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 3 ऑक्टोबर :- जिल्ह्यात ज्‍या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर शासनाकडून मदतीची रक्‍कम जमा करण्‍यात आली आहे त्‍या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर जमा झालेली मदतीची रक्‍कम बॅंकांनी कर्ज खात्‍यात अथवा इतर वसुलीसाठी वळती करु नये, असे निर्देश जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्‍हा अग्रणी बॅंक व जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था यांना दिले आहेत.

नांदेड जिल्‍ह्यात ऑगस्‍ट २०२५ मध्‍ये अतिवृष्‍टी व पुर यामुळे ७ लाख ७४ हजार ३१३ इतक्‍या शेतकऱ्यांचे ६,४८,५३३.२१ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्‍याअनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाचे अहवालावरुन शासनाने एकूण ५५३.३४ कोटी रुपये मदत निधी जिल्‍ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्‍यासाठी मंजुर केला आहे. ही मंजुर रक्‍कम बाधित शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्‍यात येत आहे. आता पर्यंत जिल्‍हृयातील ४,८२,६७४ इतक्‍या शेतकऱ्यांना ३६२.०३ कोटी इतक्‍या रकमेचे वाटप करण्‍यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर संबंधीत तहसील कार्यालयातून भरण्‍यात आली आहे. उर्वरीत शेतकरी यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरण्‍याची कार्यवाही सुरु आहे.

माहिती भरण्‍यात आलेल्‍या शेतकऱ्यांचे वि.के. नंबर त्‍या गावच्या तलाठी यांच्यमार्फत गावात प्रसिध्‍द करण्‍यात आले आहेत. या वि.के. नंबरद्वारे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्‍यावर थेट मदतीची रक्‍कम डिबीटी पध्‍दतीने शासनामार्फत जमा होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Previous articleजिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केली खडकूत येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी.
Next article. अमरावती भा.ज.पा. जिल्हा शहर उपाध्यक्षपदी श्री विवेक कलोती, यांची नियुक्ती, नितीनजी धांडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.