Home नांदेड अतिवृष्टी-पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजूर निधी वाटपास सुरुवात

अतिवृष्टी-पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजूर निधी वाटपास सुरुवात

66

आशाताई बच्छाव

1002013659.jpg

अतिवृष्टी-पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी मंजूर निधी वाटपास सुरुवात

शेतकऱ्यांनी नजिकच्या सेतू केंद्रावर ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड :- जिल्ह्यात ऑगस्ट 2025 या महिन्यात अतिवृष्टी, पुरामुळे पिक नुकसान झालेल्या व V.K. नंबर भेटलेल्या शेतकऱ्यांनी नजिकच्या सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी. जेणे करुन त्यांच्या खात्यावर शासनामार्फत डिबीटी पद्धतीने मदतीची रक्कम थेट जमा होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात माहे ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 7 लाख 74 हजार 313 इतक्या शेतकऱ्यांचे ६,४८,५३३.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शासनास एकूण 553.34 कोटी रुपये मदत निधीची मागणी केली होती. ज्यानुसार शासनाने 18 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी सदर निधी मंजुर केला आहे.

ही मंजुर रक्कम बाधित शेतकरी यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार असुन आता पर्यंत जिल्हयातील 3 लाख 10 हजार 126 इतक्या शेतकऱ्यांना 230 कोटी 46 लक्ष इतक्या रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाईन प्रणालीवर तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे. माहिती भरण्यात आलेल्या शेतकरी यांचे V.K. नंबर त्या गावचे तलाठी यांच्यामार्फत गावात प्रसिध्द करण्यात आली आहे व येत आहे. सदर V.K. नंबरद्वारे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकरी यांचे खात्यावर थेट मदतीची रक्कम डिबीटी पद्धतीने जमा होणार आहे. उर्वरीत शेतकऱ्यांची माहिती पुढील 4 ते 5 दिवसात भरण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

Previous articleअज्ञान व अयोग्य व्यक्तींवर ठेवलेला अती विश्वास जीवनातील तणावाचे माहेरघर
Next articleशिंदखेडा तालुक्यातील लोहगाव-वसमाणे परिसरात केळी, पपई पिकांचे मोठे नुकसान…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.