आशाताई बच्छाव
टीळेकरवाडी ग्रामसभेत घेण्यात आलेला निर्णय इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी, शासनानेही ह्या चांगल्या निर्णयाची दखल घ्यावी…..महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव.पुणे , उमेश पाटील ब्युरो चीफ-…टीळेकरवाडी येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत आई वडीलांचा सांभाळ नाही तर वारसाहक्क नाही.हा सर्वानुमते ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.ह्या निर्णयाचे समाजातील सर्व स्तरातून टीळेकरवाडीचे सरपंच श्री गोवर्धन टीळेकर व सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ग्रामस्थ यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.या प्रसंगी महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांनीही हा निर्णय कौतुकास्पद असल्याने संबंधितांचे अभिनंदन केले.या प्रसंगी बोलतांना महंत.श्री.गोपालव्यास कपाटे म्हणाले आज समाजात आई वडील हे मातृ देवो भव, पीतृ देवो भव देवतातुल्य आहे, हे आपण ग्रंथामधे वाचतो. त्याची अंमलबजावणी ही कृतीतून झाली पाहीजे.म्हणून मी आताच्या पिढीला आवाहन करतो की कर्तव्याची जाणीव,भावना ठेवून आपल्या आई वडीलांचा सांभाळ शेवटच्या श्वासापर्यंत चांगल्या पध्दतीने करावा.समाजात जनजागृती होण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे मत महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले






