आशाताई बच्छाव
मोशी येथे क्षितिज पार्क सोसायटी मध्ये गणरायाला मोठ्या भक्ती भावात निरोप…
(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…. अशी साद घालत अनंतचतुर्दशीच्या दिवशी असंख्य पिंपरी-चिंचवडकरांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. त्याचबरोबर मोशी येथील क्षितिज पार्क या सोसायटीच्या रहिवाशांनी गणरायाला मोठ्या भक्ती बाबत निरोप दिला… दहा दिवस मोठ्या भक्ती भावाने गणरायाची आराधना करण्यात आली महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्यात घेतला होता .. बालकांसाठी व महिला भगिनींसाठी रांगोळी स्पर्धा व गीत गायन स्पर्धा व डान्स स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा… व बालकांसाठी खेळ घेण्यात आले आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम घेण्यात आला व अशा वेगवेगळ्या पद्धतीने दहा दिवस कार्यक्रम घेण्यात आले व त्याचबरोबर दिनांक ०५/०९/२०२५ वार शुक्रवार रोजी
सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता..
त्या प्रसंगी सोसायटी मधील सभासद मोठ्या संख्येने सहकुटुंब सहपरिवार सहित उपस्थित होते. विसर्जनाच्या दिवशी केळींचा प्रसाद सर्व भाविक भक्तांना देण्यात आला … गणरायाचे विसर्जन जवळच असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विसर्जन घाटावर करण्यात आली…. त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष…उपाध्यक्ष.. खजिनदार… यांनी सर्व सोसायटीमधील सभासदांचे व महिलांचे व लाडक्या बालकांचे आभार मानले व त्यांनी सांगितले की दरवर्षी आपण वेगवेगळ्या पद्धतीचा हा कार्यक्रम व उत्सव आपण एकत्र येऊन साजरा करत जाऊ असे सांगितले….
पिंपरी चिंचवड शहरातील विसर्जन घाटांवर आणि काही ठिकाणी खासगी विसर्जन हौदांमध्ये गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली होती. यंदा नदीमध्ये एकही मूर्ती विसर्जित करण्यात आली नाही तसेच हौदांमध्ये विसर्जन केल्यानंतर मुर्त्यांचे संकलन करण्यात आले. त्यामुळे नदीच्या प्रदूषणाला आळा घालण्याला यश मिळाले. शहरातील सर्व घाटांवर गणेश भक्तांचे मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळाली…