आशाताई बच्छाव
राजेंद्र पाटील राऊत लोक संघर्ष पक्षाच्या नाशिक विभाग प्रमुखपदी
निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रस्थानी असलेले लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, युवा मराठा चे संस्थापक अध्यक्ष ,युवा मराठा न्यूज पेपर्स अँन्ड वेब न्यूज नेट वर्कचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांची लोक संघर्ष पक्षाच्या नाशिक विभाग प्रमुखपदी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष अँड योगेश माकणे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे.
राजेंद्र पाटील राऊत यांचे सामाजिक चळवळीतील कार्य व्यापक स्वरूपात असून, त्यांनी अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी प्रखरपणे आवाज उठवून स्वतः ची एक ओळख निर्माण केली आहे.त्यांचा उपयोग निश्चितच लोकसंघर्ष पक्षाला होणार असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिवाय महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निश्चितपणाने उभे करण्यात येतील असे नवनियुक्त नाशिक विभाग प्रमुख राजेंद्र पाटील राऊत यांनी सांगितले.
या निवडीबद्दल लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेच्या राज्य कार्यकारिणी मुख्य सचिव आशाताई बच्छाव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामभाऊ आवारे सर निफाड, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप पाटील सांगली, मुख्याध्यापक गोरखनाथ कुणगर प्रदेश उपाध्यक्ष नाशिक, भारत पवार प्रदेश उपाध्यक्ष ओझर, नरेंद्र पाटील प्रदेश उपाध्यक्ष जळगाव, राजेंद्र दत्तात्रय होळकर प्रदेश उपाध्यक्ष लासलगाव, प्रथमेश गायकवाड प्रदेश राज्य सचिव ठाणे, उमेश कुलकर्णी प्रदेश राज्य सचिव ओझर, फैयाज मोमीन प्रदेश राज्य कोषाध्यक्ष भिवंडी, मुजद्दीन मोमीन अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष रायगड ,शत्रुघ्न निकम भटके विमुक्त जाती जमाती अध्यक्ष सोलापूर, सूर्यकांत भोर महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पुणे,आदींसह सर्व कार्यकारिणीच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या आहे.






