Home नाशिक ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांना साहित्यिक व सांस्कृतिक रत्न पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांना साहित्यिक व सांस्कृतिक रत्न पुरस्कार प्रदान

227

आशाताई बच्छाव

1001770682.jpg

ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांना साहित्यिक व सांस्कृतिक रत्न पुरस्कार प्रदान

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

आम्ही मुंबईकर वृत्तपत्राच्या वतीने येथील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार ,अपंग सेवक, वृक्षमित्र, डॉ. रवींद्र भोळे महाराज यांना मुंबई येथे एका खास कार्यक्रमात साहित्य व सांस्कृतिक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.आम्ही मुंबईकर वृत्तपत्राच्या वतीने साहित्य, सांस्कृतिक ,सामाजिक, लेखक कवी व अभिनेते अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत कार्यकर्त्यांना साहित्य व सांस्कृतिक रत्न पुरस्कार येथे प्रदान करण्यात आले. डॉ रवींद्र भोळे यांनी पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई प्रतिष्ठान, डॉक्टर मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट या संस्थांच्या स्मरणिकेचे कार्य व प्रकाशन केलेले आहे. त्यांनी मराठवाडा भूकंप, नैसर्गिक आपत्ती, वृक्षारोपण, मतिमंद मूकबधिर वैद्यकीय व पुनर्वसन सेवा मदत कार्य, व्यसनमुक्ती, एड्स निर्मूलन, कॅन्सर टीबी लेप्रसी यासाठी जनजागृती, तंबाखू मुक्त मोहीम, स्वाइन फ्लू , पल्स पोलिओ कुष्ठरोग दूरीकरण मोहीम, शालेय आरोग्य तपासणी, इत्यादी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान केलेले आहे. तसेच कुपोषण , एकात्मिक बाल विकास यासाठी ही कार्य केलेले आहे. कोरोना पंडेमिक मध्ये रात्रंदिवस वैद्यकीय सेवा केली आहे. राज्यभर तीसहून अधिक अपंग संस्थांमध्ये ते सेवा कार्य करीत आहेत. ड्रीम्स युवा फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियानाग्रुप मध्ये सक्रिय सहभाग घेऊन डोंगरांमध्ये वृक्षारोपण करून वृक्षमित्र असल्याचे सिद्ध केलेले आहे. तसेच अनेक ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये आयोजन केलेले आहे. संस्थात्मक कार्यही त्यांनी केलेले आहेत. उरुळी कांचन येथील सरस्वती शाळेचे उपाध्यक्ष, तसे संत यादव बाबा माध्यमिक विद्यालयाचे सल्लागार सदस्य, महावीर मूकबधिर विद्यालयाचे सल्लागार सदस्य, सेवाधाम मतिमंद , गोयल मूकबधिर विद्यालय पेरणे फाटा कोरेगाव भीमा येथे ते सदस्य व वैद्यकीय सेवेचे कार्य करीत आहेत.विविध संस्थांच्या माध्यमातून बेरोजगारांना , निसर्गोपचार, वोकेशनल ट्रेनिंग कोर्सेस दिलेले आहेत. त्याचप्रमाणे पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई प्रतिष्ठान क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार सलग्न वतीने आरोग्य तपासणी, विविध कॅम्पचे आयोजन, युवा कार्य, युवकांना योग्य मार्गदर्शन, तसेच लोक संसद कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केलेले आहे. उरुळी कांचन येथे डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र द्वारे गेली तीस वर्षापासून ते गोरगरीब जनतेला, ऊसतोड मजुरांना अत्यल्प दरात धर्मदायद्वारे वैद्यकीय सेवा देत आहे. डॉ. रवींद्र भोळे एक महान निष्काम कर्मयोगी कार्यकर्ते असून वैद्यकीय ,सामाजिक, धार्मिक ,अध्यात्मिक, शैक्षणिक अपंग, पर्यावरण क्षेत्र ,व्यसनमुक्ती, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन ,प्रवचनाद्वारे प्रबोधन स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत मिळवून देणे ,हृदयरोगांना आर्थिक मदत मिळवून देणे ,अशा अनेक क्षेत्रांमध्ये गेली 40 वर्षे पासून समर्पित भावनेने निष्काम कार्य करीत आहेत. तसेच डॉ रवींद्र भोळे यांच्या जीवनावर वाळवंटातील समाजसेवी सरोवर लेखक भास्कर भोसले यांनी चरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे. अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम सादर केलेलेअसून अखंड हरिनाम सप्ताहातील स्मरणिकांसाठी मोलाचे योगदान,मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आम्ही मुंबईकर वृत्तपत्राच्या वतीने सामाजिक साहित्यिक व सांस्कृतिक रत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. जोगेश्वरी श्रीकृष्ण नगर येथे झालेल्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही मुंबईकर वृत्तपत्राचे संपादक प्रमोद नरसिंग सूर्यवंशी, उपसंपादिका वसुधा नाईक, गौरव पुंडे, योगेश हरणे, महेश सोनवणे, रेखा हरियाण मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक राम घडे, अभिनेते अजय बिरारी, सागर देशमुख अभिनेते, ज्यू चार्ली (सोमनाथ स्वभावाने) व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला योगिता जाधव, अंगद दरडे, स्वरा कदम, आशा ब्राह्मणे , किशोरी पाटील, योगिता कोठेकर रज्जाक शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते.याच कार्यक्रमांमध्ये मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिका ,प्राध्यापक, सकल जैन महिला जागृती एचबी टाइम्स च्या प्रतिनिधी डॉ.ललिता जोगड यांनी उपस्थिती लावून आपल्या कविता सादर केल्यात. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौसुचित्रा कुंचमवार, शैल सुतार यांनी केले.आभार प्रदर्शन गोरख पुंडे यांनी केले. हा कार्यक्रम मुंबई जोगेश्वरी येथील श्रीकृष्ण नगर मध्ये संपन्न झाला.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील कोंडेश्वर मार्ग लगतच्या महसूल जागेवर इमारत साकारणार लवकरच ई बस चार्जिंग स्टेशन साठी दहा कोटीच्या निविदा.
Next articleEpaper Yuva maratha – 2 August
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.