Home पुणे ‘‘UNCLOG Chakan MIDC’’ साठी आमदार महेश लांडगे ‘ऑन फिल्ड औद्योगिक कंपन्या, संघटनांच्या...

‘‘UNCLOG Chakan MIDC’’ साठी आमदार महेश लांडगे ‘ऑन फिल्ड औद्योगिक कंपन्या, संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक

80
0

आशाताई बच्छाव

1001753757.jpg

‘‘UNCLOG Chakan MIDC’’ साठी आमदार महेश लांडगे ‘ऑन फिल्ड
औद्योगिक कंपन्या, संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक
पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी ब्युरो चीफ उमेश पाटील
चाकण औद्योगिक पट्टयातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधांच्या समस्यांमुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आणि कर्मचारी यांसह वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक शासकीय अस्थापनांमध्ये सक्षम समन्वयाची आवश्यकता आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे आश्वासन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिले.चाकण औद्योगिक पट्टयात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर राज्य सरकारकडे दाद मागण्यासाठी औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी संघटनांनी ‘‘UNCLOG Chakan MIDC’’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेला आमदार लांडगे यांनी पाठिंबा दिला आहे.दरम्यान, संघटनांचे प्रतिनिधी आणि आमदार लांडगे यांची बैठक घेण्यात आली. यावेळी चाकण इंडस्ट्रिअल फेडरेशनचे सीईओ दिलीप बटवाल, चाकण इंडस्ट्रिअल असोसिएशनचे जीएम सुधीर मित्तल, चाकण एमआयडीसी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे संस्थापक जयदेव अक्कलकोटे, अतुल इनामदार, ट्रॅफीकमुक्त चाकण कृती समितीचे प्रशांत टोपे, श्रीरंग कुलकर्णी, विनोद पाटील, रुपेश भंडारे, मनोजकुमार गायकवाड, विनोद पवार, राजेश जेजुरकर, अतुल शिंदे, अविनाश गोसावी, विजय पाटील, कुणाल कड, प्रमोद शिंदे, प्रसाद हरमन, प्रतिक जाधव, विनायक अलवेकर, नितीन जिवाडे आदी उपस्थित होते.आमदार लांडगे म्हणाले की, चाकण औद्योगिक क्षेत्र समस्यामुक्त करण्यासाठी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत औद्योगिक कंपन्यांचे शिष्टमंडळ घेवून हिंजवडी आयटी पार्क समस्यामुक्तीसाठी ज्या प्रमाणे बैठक घेतली आणि कामाला गती दिली. त्याचप्रमाणे चाकण औद्योगिक पट्टा समस्यामुक्त करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.बैठकीतील प्रमुख मुद्दे :
1. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बैठक नियोजित करणे.
2. भूसंपादन आणि रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावले. त्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत पाठपुरावा.
3. एमआयडीसी आणि चाकण औद्योगिक पट्टयातील रस्त्यांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवणे.
4. स्पायसर चौक : भूसंपादन झाले आहे. मात्र, रस्त्याचे काम आणि चौक प्रशस्त करणे.
5. MIDC ते फेज-2, साडुंबारे, खालींबरे, मिसिंग लिंक्स काम पूर्ण करणे.
6. कॉर्निंग कंपनी ते पुणे-नाशिक महामार्गाच्या कामाला गती देणे.
7. प्रस्तावित रस्त्यांची यादी तयार करणे आणि पाठपुरावा नियोजन करावे. रस्त्यावरील खड्डे बुजवणे.
8. अवजड वाहनांसाठी पार्किंग सुविधा करावी. वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ‘रेड स्पॉट’ निश्चित करणे. त्यावर कार्यवाहीचा ‘ॲक्शन प्लॅन’ करावा.
9. हिंजवडी आयटी पार्कप्रमाणे चाकण एमआयडीसीठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’ निश्चित करणे.
10. रस्त्यांना अडथळा ठरणारे MSEB चे पोल हटवण्यासाठी नियोजन करणे.पिंपरी-चिंचवड, पुणे परिसराची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर आयटी आणि इंडस्ट्रिअल हब अशी आहे. मात्र, हिंजवडी आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक क्षेत्र समस्यांच्या विळख्यात आहे. यामुळे आयटी कंपन्या आणि औद्योगिक कंपन्या त्रस्त असून, सर्वसामान्य वाहनचालक, कर्मचारी यांना प्रचंड गैरसोईचा सामना करावा लागतो. वाहतूक सक्षम नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढलेली आहे. याबाबत पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली आणि हिंजवडी समस्या मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आता चाकण औद्योगिक पट्टा समस्यामुक्त करण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे

Previous articleपुण्याची वाहतूक कोंडी फुटणार, लवकरच होणार नवा रेल्वे मार्ग, इथं 250 एकरांवर मेगा टर्मिनल!
Next articleपिंपरी चिंचवड येथे मराठी पत्रकार संघ व ईशा नेत्रालयातर्फे नेत्रचिकित्सा शिबिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here