Home भंडारा आईचा मृत्यूशी दोन हात, लेक मात्र गमावला तब्बल २४ तास झुंज ;...

आईचा मृत्यूशी दोन हात, लेक मात्र गमावला तब्बल २४ तास झुंज ; तर निष्पाप बाळाचा बळी ; कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर ; शंकरपूर गावात शोककळा

110
0

आशाताई बच्छाव

1001701561.jpg

आईचा मृत्यूशी दोन हात, लेक मात्र गमावला

तब्बल २४ तास झुंज ; तर निष्पाप बाळाचा बळी ; कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर ;
शंकरपूर गावात शोककळा

संजीव भांबोरे
भंडारा – (साकोली) “तुझ्याविना जगणे, म्हणजे पाण्याविना मासा. अश्रूंचा बांध फुटला, आता थांबणार कसा” आई म्हणजे लेकराची माय. तर वासराची गाय असते. आई म्हणजे दुधावरची साय, तर लंगड्याचा पाय असते. एवढचं नव्हे तर आई म्हणजे धरणीची ठाय असते. आईसाठी तिचे बाळ हे तिचे जग असते पण जेव्हा आपल्या पोटचं बाळं आई गमावते तेव्हा मात्र तिचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीणचं. ते या अत्यंत केविलवाण्या घटनेतून दिसून येत आहे.
जणू असचं काही घडलं व सगळं होत्याच नव्हतं झालं. तालुक्यातील ग्रा. पं. वडेगांव अंतर्गत येणारे पन्नास ते साठ वस्तीचं छोटस आदिवासी गांव वार्ड क्र. ०३ म्हणजेच शंकरपुर. गावात आदिवासी समाज जास्त असला तरी इतर समाजाचे लोकही गुण्यायगोविंदाने एकत्रित राहून स्वतःचा संसार चालवित होते. मात्र; अंगणवाडी मदतनीस पदाची भरती निघाली आणि गावाला काळाजी नजर लागली. फेब्रुवारी २०२५ ला एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र अवैध पद्धतीने भरती प्रक्रिया राबविल्याने गावकऱ्यांना ती मान्य नव्हती. न्यायासाठी या कार्यालयातून त्या कार्यालयात जाऊन गावकरी अधिकाऱ्यांना विनवणी करायचे. चार महिने लोटले मात्र पदरात यश पडले नाही. अधिकाऱ्यांच्या अन्यायामुळे अत्याचार आपल्या सीमा ओलांडत होता. दरम्यान एका चार महिन्यांच्या गर्भवती मातेला त्रास व वेदना झाल्या असता तिने आपल्या पतीसह उपजिल्हा रुग्णालय गाठले. मात्र बाळाचे गर्भातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले व पालकांना त्याचा जणू धक्काच बसला. बाळंतपणासाठी सलग २४ तासांचा विलंब करावा लागला असून आईनी आपल्या बाळासाठी आपला जीव पणाला लावला. मात्र गर्भातील चार महिन्यांचे बाळ जगणार तरी कसे.? शेवटी आईने बाळ गमावलं व जणू एक हंबरडाचं फोडला. सलग ७२ तासांनी डॉक्टरांनी आईला दवाखान्याची रजा दिली. मात्र गावात शोककळा पसरली आहे. तर या संपूर्ण प्रकरणात जो कुणी दोषी आहे त्यावर कठोर शिक्षा व्हावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

Previous articleविद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे असं शिक्षण मिळालं पाहिजे:_ राज्यपाल हरिभाऊ बागडे
Next article“जगह आपकी.. वक्त आपका.. बताईये कहाँ आना है?” – इम्तियाज जलील यांचे आम. संजय गायकवाडांना खूले चॅलेंज !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here