Home भंडारा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे असं शिक्षण मिळालं पाहिजे:_ राज्यपाल हरिभाऊ बागडे

विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे असं शिक्षण मिळालं पाहिजे:_ राज्यपाल हरिभाऊ बागडे

37
0

आशाताई बच्छाव

1001701549.jpg

विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे असं शिक्षण मिळालं पाहिजे:_ राज्यपाल हरिभाऊ बागडे

साकोली येथील भारत सभागृहात प्रतिपादन

 

संजीव भांबोरे
भंडारा _गावाचा स्वर्ग करायचे असेल तर सर्वांनी झटले पाहिजे आम्ही डॉ हेमकृष्ण कापगते व मी जनसंघामध्ये वाढलो जनसंघाच्या शाखा वाढवल्या खूप मेहनत घेतली, परिश्रम घेतले आम्ही काम केल्याने आत्मविश्वास वाढला आणि मेहनत, परिश्रम, संघर्ष केल्याने आत्मविश्वास वाढतो .मान, सन्मान वाढतो व आपोआपच पदे आपल्याला मिळतात .मी राज्यपाल पद मागण्याकडे गेलो नाही आपोआपच पंतप्रधान कडून मला फोन आला व आपल्याला बाहेर राज्यात जावे लागते असे सांगितले गेले .त्यामुळे परिश्रमाचे हे फळ आहेत असे मत राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सांगितले . पुढे ते म्हणाले की ,शिक्षण हे चांगलं असले पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढला पाहिजे, डॉ हेमकृष्ण कापगते यांचे वडील शामराव बापू कापगते तेव्हा मोठ्या अडचणीत त्यांनी जनसंघ उभा केला व चार आमदार निवडून आणले .व महानगरपालिकेच्या उमेदवार निवडून आणले तो आणीबाणीच्या काळ होता. नवे नवे शिक्षण घेतले पाहिजे .आता नवीन शिक्षा पद्धती आली ती आता सर्वांनी अंगीकारलं पाहिजे .विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे असे मत माजी आमदार डॉ हेमकृष्ण कापगते यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भारत सभागृह येथे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा या कार्यक्रमात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, यांनी आपले मत व्यक्त केले.
याप्रसंगी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉ प्रशांत पडोळे, माजी खासदार सुनील मेंढे, सत्कारमूर्ती डॉ हेमकृष्ण कापगते, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार परिणय फुके, सत्कार समितीचे अध्यक्ष रामभाऊ चाचरे, डॉक्टर वसंत भोंडे, किशोर चौधरी, डॉ गजानन डोंगरवार ,व इतरही मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते .
राज्यपाल यांना पोलीस विभागातर्फे मानवंदना देण्यात आली .पोलीस विभागातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी सांगितले की, माजी आमदार डॉक्टर हे वृक्षमित्र आहेत त्यांनी कित्येक आरोग्य शिबीर घेतले. एकदम साधे सिम्पल आणि त्यांच्या घराचा संस्कार अतिशय शिस्तबद्ध आहे .अतिशय साधे भोळे स्वतःला श्रीमंतीच्या गौरव नसणारा प्रामाणिक कार्यकर्ताअसे गौरव उद्गार त्यांनी काढले.
माजी खासदार सुनील मेंढे यांनी सुद्धा त्यांच्या लहानपणीच्या एक प्रसंग सांगून डॉक्टर साहेब किती साधे भोळे आहेत आणि संघाचे काम कसे प्लॅनिंग पूर्व पद्धतीने करतात त्यांच्या काळात विविध चांगले कामे झालेले आहेत असे मत व्यक्त केले .
आमदार परीनय फुके यांनी सांगितले की ,सेवेसाठी स्वतःला वाहून घेणारा वडेगाव येथे 1989 पासून आरोग्य शिबिर मोफत देणारा सगळ्या क्षेत्रात काम करणारा व एक लाख झाडे संगोपन करणारा एक आदर्श म्हणून आमदार म्हणून ओळखला जातो असे मत परीनय फुके यांनी मांडले.
सत्कारमूर्ती माजी आमदार यांना 80 वर्ष चा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे असे डॉ हेमकृष्ण कापगते यांनी सांगितले की आम्ही डॉक्टर असताना मृतदेहावर अभ्यास करावा लागत होता त्यामुळे अभ्यास करताना मृतदेह सुद्धा मिळत नाही म्हणून डॉक्टरच्या उपयोगीत येणारा मृतदेह अभ्यासासाठी असन्या करिता सर्वांनी देहदान , डोळे दान केले पाहिजे, रक्तदान केले पाहिजे असे आव्हान केले.
याप्रसंगी इतरही मान्यवरांची भाषणे झाली .
त्यानंतर समाजसेवक यांच्या विशेष योगदान आहे अशांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये, श्याम झिगरे ,डॉ प्रतिभा राजहंस, मुरलीधर गजापुरे गुरुजी, पुरुषोत्तम रुखमोडे, साहित्यिक हरिश्चंद्र बोरकर ,पत्रकार अशोक गुप्ता , पक्षीतज्ञ किरण पुरंदरे, पत्रकार डी.जी रंगारी ,प्रबोधनकार भावेश कोटांगले असे 80 लोकांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे समितीचे सचिव राजू दुबे यांनी केले . कार्यक्रमाचे संचालन गायधने मॅडम यांनी केले. तर आभार एडवोकेट मनीष कापगते यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रामभाऊ चाचेरे ,राजू दुबे, मनीष कापगते, विजय भाऊराव सखाराम कटरे, केशव मानकर, डॉ प्रतिभा राजहंस, प्रवीण पटेल, गुलाब मेश्राम, कुंदन वलके , व्यंकटेश येवले ,रेखाताई भाजीपाले, अरुण बडोले ,गौरव कावळे ,जनार्दन दोनोडे ,मधु नगरकर ,हिरालाल पारधीकर, दर्शन उंमरे, शंकर हातझाडे व इतरही सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here