Home नाशिक चिंचावड ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र बतीसे कडून साडेसात लाखांची फसवणूक

चिंचावड ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र बतीसे कडून साडेसात लाखांची फसवणूक

907

आशाताई बच्छाव

1001696391.jpg

चिंचावड ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र बतीसे कडून साडेसात लाखांची फसवणूक
मालेगाव : तालुक्यातील चिंचावड ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी असलेल्या राजेंद्र बतीसे यांनी आपल्या पदाचा गैरफायदा उचलत अशिक्षित आदिवासी महिला सरपंचांना अंधारात ठेवून सुमारे साडेसात लाख रुपयांची फसवणूक ठेकेदारांच्या मदतीने केली असल्याचा आरोप लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी केला आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,चिंचावड या गावी आदिवासी महिला सौ.शोभा आधार सोनवणे या सरपंच म्हणून कार्यरत असताना, ग्रामसेवक राजेंद्र बतीसे यांनी महिला सरपंचांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता ठेकेदारांच्या संगनमताने परस्पर गावात सुरू असलेल्या स्मशानभूमी कामाचे बिल काढताना सुमारे सात लाख, चाळीस हजार , सहाशे पंचवीस रुपयांचा धनादेश सरपंचाची बनावट सही करुन काढून घेण्यात आले.
तर स्मशानभूमीच्या कामासाठी एकूण दहा लाखांचा निधी मंजूर असताना व काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र बतीसे यांनी ठेकेदारासोबत संगनमत करून फसवणूकीने सदर लाखो रुपयांची रक्कम हडप केली आहे.
त्याशिवाय चिंचवड ग्रामपंचायतीचे कँनरा बँकेत खाते असून तेथे असलेल्या सरपंचाच्या डिजीटल सहीची कि देखील ग्रामसेवक बतीसे यांनी आपल्याजवळ ठेवलेली आहे.त्यामुळे या प्रकाराची तात्काळ सखोल चौकशी करण्यात येऊन, ग्रामसेवक बतीसे कडून सदरची रक्कम वसूल करण्यात यावी व ठेकेदारास काळया यादीत टाकण्यात यावे या मागणीसाठी लोकहित माहिती अधिकार पत्रकार पोलिस संरक्षण संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

Previous articleसमाजाचा मजबूत कणा म्हणजे प्रामाणिक पत्रकारीता: – नानासाहेब जावळे -पाटील
Next articleआदिवासी वनहक्क अभियानाला गती: शेवरे सह तीन गावांनी दाखवला पुढाकार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.