Home नांदेड मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटीत भेट; बळवंतराव पाटील यांनी केली तब्येतीची...

मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटीत भेट; बळवंतराव पाटील यांनी केली तब्येतीची विचारपूस

145

आशाताई बच्छाव

1001661445.jpg

मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटीत भेट; बळवंतराव पाटील यांनी केली तब्येतीची विचारपूस

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मराठा आरक्षणासाठी लढणारे योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची मुखेड पंचायत समितीचे माजी सभापती व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन मुंबईचे संचालक बळवंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी आंतरवाली सराटी येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

या भेटीत त्यांनी मुंबईत होणाऱ्या आगामी मराठा मोर्चासंदर्भात सविस्तर चर्चा केली. मराठा समाजाच्या मागण्या आणि त्यासंदर्भातील पुढील रणनीती यावरही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन बळवंतराव पाटील यांनी दिले.

या भेटीमुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता असून, समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous articleनांदेडमधील 28 कृषी सेवा केंद्रावर कार्यवाही ; कृषी विभाग अॅक्शन मोडवर
Next articleडॉक्टर डे निमित्त देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सन्मान.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.