Home नाशिक कौळाणेचे ज्येष्ठ पत्रकार व युवा मराठा न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत...

कौळाणेचे ज्येष्ठ पत्रकार व युवा मराठा न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

124

आशाताई बच्छाव

1001658071.jpg

कौळाणेचे ज्येष्ठ पत्रकार व युवा मराठा न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

नाशिक (सुदर्शन बर्वे प्रतिनिधी)-  रविवार दि.२९/६/२०२५ रोजी मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने २९ जून रोजी जोशी नर्सरी शेजारी व के.के.वाघ कॉलेज समोर मुंबई आग्रा हायवे नाशिक ३ द पवार गार्डन मध्ये जीवन गौरव पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन आले होते. त्यामध्ये कौळाणेचे ज्येष्ठ पत्रकार व युवा मराठा न्यूजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत  (संस्थापक अध्यक्ष युवा मराठा महासंघ महाराष्ट्र, संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे ) यांना त्यांच्या वतीने आंशूराज राजेंद्र पाटील राऊत पत्रकार प्रविण क्षीरसागर यांनी जीवन गौरव पुरस्कार सौ.शेफालीताई भुजबळ यांच्या हस्ते स्विकारला व त्यांना सन्मानित करण्यात आले. मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक ह्या दोन्ही संस्था सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आलेले आहेत. मनु मानसी संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, महिलांचे सबळीकरण यावर कार्य करते. अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम साठी सतत दोन्ही संस्था कार्य करत असतात.
मनु मानसी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्या वतीने समाजासाठी आदर्श ज्येष्ठ नागरिक यांचे साठी जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रमुख अतिथी डॉक्टर शेफाली ताई भुजबळ, श्री.सुनील पवार सर (पोलीस निरीक्षक क्रम ब्रांच नाशिक), महंत भक्ती चरणदास जि महाराज (अ.भा आखाडा परिषद राष्ट्रीय प्रवक्ता तथा कुंभमेळा अध्यक्ष), राम डावरे सर (सी.ए.), डॉ.विठ्ठल सिंग ठाकरे सर, सौ.मेघाताई राजेश शिंपी (मनू मानसी संस्थापिका अध्यक्ष), डॉ.अनिल नहार (महावीर इंटरनॅशनल नाशिक) श्रीमती मंजू जखाडी कार्याध्यक्ष नाशिक या मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. मनु मानसी संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच माझ्या सर्व बंधूंच्या आग्रा हस्त जीवन गौरव पुरस्कार महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने मनु मानसी बहुउद्देशीय संस्था घेतली संस्थापिका सौ. मेघाताई राजेश शिंपी यांनी व्यक्त केले.
समाजमध्ये कार्य करतो तेव्हा अनेक अडचणी येतात पण जेव्हा एक सामाजिक संस्था दुसऱ्या सामाजिक संस्थेला मदतीचा हात देते तेव्हा ते कार्य होऊ शकते. संस्था पण पुढे जाते. खरोखरच आज महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष मा.श्री डॉ.अनिल नहार सरानी मनु मानसी संस्थेला पुढे नेण्यासाठी मदतीचा हात दिला खरोखरच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मागे वळून बघता माझ्या अनेक सामाजिक संस्थनी मनु मानसी बहुउद्देशीय संस्थेला सहकार्य केले आहे. कारण मनु मानसी संस्थेच्या कार्याची पद्धत, नियोजन खुप छान असते.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे अशा ७० बंधूंना सन्मानित करणार आहोत. ही माहिती महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष डॉ.अनिल नहार सर, मनु मानसी संस्थेच्या संस्थापिका सौ मेघा ताई राजेश शिंपी, कार्याध्यक्ष मंजू जाखाडी यांनी दिली आहे. या समारंभास बहुसंख्य सर्वांची उपस्थिती होती.

Previous articleमाहोरा गावात मोठी घरफोडी: पाच ते सहा चोरट्यांनी दोन लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल केला लंपास
Next articleनांदेडमधील 28 कृषी सेवा केंद्रावर कार्यवाही ; कृषी विभाग अॅक्शन मोडवर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.