Home नांदेड तळ्यात बुडून तरुण युवकाचा मृत्यू

तळ्यात बुडून तरुण युवकाचा मृत्यू

97

आशाताई बच्छाव

1001650102.jpg

तळ्यात बुडून तरुण युवकाचा मृत्यू

नांदेड :- प्रतिनिधी शिवाजी धुमाळे 
दि. 29 जुन रोजी नांदेड पासून जवळच असलेल्या डेरला येथील तरुण शंकर बाबाराव शिंदे वय वर्ष 34 याचा गावातील तळ्यात मृतदेह आढळून आला सदरील व्यक्ती हा गेली सात ते आठ दिवसापासून बेपत्ता होता गावालगत असणाऱ्या तळ्या जवळ गावातीलच एक लहान मुलगा आपली जनावरे चारत होता त्या मुलाची जनावरे तळ्याशेजारी गेल्याने तो तिथे गेला असता त्याच्या निदर्शनास आल्याने त्याने जवळच असलेल्या व्यक्तींना ही बाब लक्षात आणून दिली मृत व्यक्ती हा फुगलेल्या अवस्थेत आढळून आला गावातील पोलीस पाटील व सरपंच व नातेवाईक तसेच गावातील नागरिक यांच्या पुढाकाराने मृत शव तळ्याबाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले मृत व्यक्तीच्या पश्चात आई वडील, भाऊ, भावजय, बायको,एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे

Previous articleराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आरमोरीत उत्साहात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पुढाकार
Next articleप्रा.आनंद भोजने, राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.