Home नाशिक उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांचा राजीनामा.

उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांचा राजीनामा.

109
0

आशाताई बच्छाव

1001608400.jpg

भिला आहेर तालुका प्रतिनिधी 
देवळा :- उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांचा राजीनामा.
स्व. निवृत्ती काका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक यांचेकडे सुपूर्द केल्याने भविष्यात या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नाशिक जिल्ह्यातील अत्यंत कमी कालावधीतच नावारूपाला आलेल्या व शेतीमालाला योग्य दाम आणि शेतमालाची भरपूर आवक असलेल्या उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीची गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी बिनविरोध निवड झाली होती. त्यावेळी आवर्तन पद्धतीने सभापती व उपसभापती पदाची निवड होईल असे संचालक मंडळाने सर्वानुमते ठरले होते त्यानुसार सभापती प्रशांत देवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून भविष्यात सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया:- ज्यावेळी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली होती तेव्हाच आवर्तन पद्धतीने सभापती व उपसभापती पदाची निवड होईल असे ठरले होते .मला दोन वर्षांसाठी सभापतीपदाचे आवर्तन दिले होते मात्र साडेतीन वर्षे संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास ठेवत मी या पदावर कार्यरत होतो . त्यामुळे मी स्वखुशीने या पदाचा राजीनामा देत असून भविष्यात या पदाची धुरा कोणाकडे द्यायची हे आम्ही संचालक मंडळ एकत्र बसून ठरवू.
……प्रशांत देवरे ,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, उमराणे

Previous articleशिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा चक्का जाम आंदोलनास प्रचंड प्रतिसाद सुमारे दीड तास वाहतुक कोलमडली :  दुरदुरपर्यंत वाहनांच्या रांगा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here