Home धाराशिव बच्चु भाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या उमरगा येथे रास्ता रोको...

बच्चु भाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या उमरगा येथे रास्ता रोको आंदोलन

213
0

आशाताई बच्छाव

1001594200.jpg

बच्चु भाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या उमरगा येथे रास्ता रोको आंदोलन       उमरगा धाराशिव प्रतिनिधी: बच्चु भाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस असुन त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.बच्चु भाऊ कडू गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात अन्नत्याग आंदोलन करत आहेत .या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने उद्या दिनांक १३ जून रोजी ठीक ११वाजता तहसील कार्यालयासमोरील उमरगा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 येथे भव्य ‘रास्ता रोको ‘करण्यात येणार आहे .अशा आशयाचे निवेदन प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन कार्यालय यांना देण्यात आले. शेतकरी ,कष्टकरी ,कामगार , दिव्यांग महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी मा .बच्चु भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे दिनांक ८ जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे .परंतु शासनाने या मागण्याबाबत अद्याप पर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांचा पूर्ण पाठिंबा आहे. या आंदोलनाला बळ देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १३जून रोजी उमरगा येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे रास्ता रोको ची हाक देण्यात आली आहे.सदर आंदोलन लोकशाही मार्गाने ,शांततेत व नियमानुसार पार पडेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.या आंदोलनाला तालुक्यातील तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन उपस्थिती दर्शवावी अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळीअखिल भारतील छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने ,प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष रामेश्वर मदने, शहर प्रमुख नागराज मसरे, भास्कर वाघमारे, शेखर मुलगे ,अशोक कांबळे, राहुल मन्नाडे, राऊ मुळे, शकील कुरेशी, संतोष सुरवशे ,तानाजी सोमवंशी ,भैरवनाथ बामणे ,सतीश टोपगे, निर्मला सुरवसे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Previous articleमनसे कडून १ मे रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाची तहसीलदाराकडून कारवाई नाही
Next articleवादळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पाहणी 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here