Home सामाजिक वाढदिवस शुभकामना आशाताई औक्षवंत व्हा..!

वाढदिवस शुभकामना आशाताई औक्षवंत व्हा..!

16
0

आशाताई बच्छाव

1001591383.jpg

🌹 वाढदिवस शुभकामना🌹
आशाताई औक्षवंत व्हा..! आज गुरुवार दिनांक १२ जुन २०२५! आशाताई बच्छाव रा.व-हाणे ,ता.मालेगाव जि.नाशिक यांचा वाढदिवस…! अगदी गरीबीच्या काटेरी वाटा तुडवत,या स्वाभिमानी व ध्येयवादी असलेल्या महिलेने संघर्षाला आपलेसे करून घेत, अगदी स्वबळावर प्रगती केली.कुणाचाही सहारा किंवा आधार नाही, तरीही एकट्याने लढत राहिली.पाठीशी लहान मुले असताना कुणाचीही पर्वा न करता आपली ध्येयाकडे वाटचाल सुरुच ठेवली.या बिकट काळात आशाताई बच्छाव यांना कुणीही जवळच्या नातेवाईकांनी सहकार्य अथवा साथ दिली नाही.व-हाणे सारख्या खेडेगावात जन्म झालेल्या आशाताई बच्छाव यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर राज्यस्तरीय वृत्तपत्र सत्यवार्ता व पोलीस नजर सारख्या आघाडीच्या वृत्तपत्रात एक निर्भिड व डँशिग महिला पत्रकार म्हणून काम केले.तर पुढे युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलच्या व्यवस्थापकीय संपादक म्हणून सन २००९ पासून कार्यभार सांभाळला तो आजतागायत कायम आहे.सामाजिक कार्याचा कुठलाही वारसा घरातून नसतांनाही त्यांनी स्वतः ला सामाजिक कार्यात झोकून दिले.सन २०२१ मध्ये आश्रयआशा फाउंडेशन हि संस्था व-हाणे गावी स्थापन करून आज त्या संस्थेच्या आशाताई बच्छाव या संस्थापक सचिव म्हणून कार्यरत असताना, विविध समाजोपयोगी उपक्रम त्यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविले आहेत.महिला मेळावा घेऊन महिलांना सन्मानित करुन पुरस्कार दिलेत, वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले, गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप केले, पाणपोई सुरू केली अशा एक ना अनेक प्रकारच्या समाज हिताच्या कार्यात आशाताई बच्छाव यांनी स्वतः ला झोकून दिले.एक ध्येयवादी महिला,संघर्ष वादी महिला, एकनिष्ठ व प्रामाणिकेतेचे मुर्तीमंत उदाहरण आशाताई बच्छाव यांच्या सामाजिक कार्याकडे बघितल्यावर स्वाभाविकच लक्षात येते.स्वाभिमानी, निष्ठावंत, एकनिष्ठ, प्रामाणिक,व संघर्षवादी असलेल्या आशाताई बच्छाव यांना आज त्यांच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त लाखमोलाच्या अनमोल शुभेच्छा व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभकामना! लेखन व शब्दांकन:- राजेंद्र पाटील राऊत संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाउंडेशन व-हाणे

Previous articleवाढदिवस शुभकामना आशाताई औक्षवंत व्हा..!
Next articleपिंपळनारे गावात कृषीदूतांचे आगमन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here