
आशाताई बच्छाव
जागतिक नेत्रदान दिवस:
एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे सर्व भाग महत्वाचे असतात, परंतु डोळ्यांना यामध्ये थोडे अधिक महत्त्व असते. डोळे ही देवाची देणगी आहे. ज्याचे डोळे नसतात त्यांच्याकडूनच त्याचे मूल्य चांगले समजू शकते. मृत्यूनंतर डोळ्यांनी दान देऊन आपण कोणालाही नवीन जीवन देऊ शकता.
नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस जगभर अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांना नेत्रदानाचे महत्त्व सांगून नेत्रदानाची जनजागृती केली जात
उद्देश्य:
जागतिक नेत्रदान दिनाचे उद्दिष्ट नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना त्यांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर डोळे दान प्रवृत्त करणे आहे.अंधत्व ही विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार(WHO) कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वाच्या मुख्य कारणांपैकी आहे.
मानवी जीवनात दृष्टीला प्रचंड महत्व आहे,कारण डोळे असले तर कोणतेही काम मणुष्य सहज करु शकतो, त्यामुळे ‘दृष्टी आड सृष्टी’ किंवा ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ ह्या म्हणी प्रचलित झाल्या आहेत. माणूस जगातील सृष्टी सौंदर्य आपल्या नेत्रचक्षुद्वारे अंतःकरणात साठवून ठेवू शकतो. त्यामुळे मानवाच्या पंचेद्रिय मध्ये डोळ्यांना मानाचे स्थान आहे. डोळ्यांचा उपयोग नयनरम्य, मनोहर सृष्टीसौंदर्य आस्वाद घेण्या बरोबर त्यांची छबी सुंदर चित्राद्वारे इतरांनाही देता येते.
दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळून जगाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी नेत्रदान , डोळेदान किंवा दृष्टीदान करण्याचा निर्णय प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहिन मानवास निश्चितच होवू शकेल. अर्थात व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान केल्यास मानवी जीवनात त्याचा उपयोग अंध व्यक्तीस निश्चित होईल.
मानवी जीवनात डोळेच फक्त मरणोत्तर अंधाना मदत करू शकतात. तेव्हा दृष्टी दानामुळे एक माणूस दुसऱ्या अंध माणसाचे जीवन प्रकाशमय करून त्याला Normal life जगण्यास मदत करु शकतो.
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांमध्ये शक्यतो व्यक्तीच्या मृत्यूनंतर 6 तासांच्या आत करण्यात येते .नेत्रदानाचा निर्णय घेतलेल्या एका मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येतात. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे जीवन प्रकाशमय होते. तुम्हालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल तर आपल्या नजीकच्या नेत्रदान हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदणी करू शकता.
नेत्रदान ही संकल्पना राबविण्यासाठीचा दिवस म्हणजे जागतिक दृष्टीदान दिवस होय. प्रत्येक व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केल्यास मोठ्या प्रमाणात जगातील नेत्रहिन व्यक्तीचे दृष्टीला प्रकाशमान करु शकतील.आजच्या काळात नेत्रदान संकल्पाचा विचार आणि आचार सामान्य माणसाच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे.
डोळ्यांमुळे माणसांच्या चेहऱ्यावरील हावभाव, स्वभाव प्रत्येक व्यक्ती सहज ओळखू शकतो. त्यामुळेच विविध भाषांमध्ये डोळ्यांच्या विशेषणांची गाणी झाली आहेत उदा.’डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे ‘, ‘डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नको’ इ. ‘डोळे’ माणसाला सौंदर्याबरोबरच अनेक गोष्टी शिकवतात. डोळे इतर अवयवांपेक्षा अधिक माहिती माणसाला देतात जसे की चेहरेपट्टी वरून ओळखला जाणारा व्यक्तीचा स्वभाव, कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी त्यातून घेतला जाणारा बोध,त्यामुळे ‘दृष्टीदाना’ चे महत्व चटकन माणसाला जाणवते. ‘दृष्टीहीन’ या सर्व गोष्टींना मुकतो,त्याच्या जीवनातील अंधार दूर होण्यासाठी किमान प्रत्येक व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान संकल्प करावा.
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे
नेत्रतज्ज्ञ
जिल्हा रुग्णालय, नांदेड.