Home उतर महाराष्ट्र केडगावात पत्रकारावर जीवघेणा हल्ला

केडगावात पत्रकारावर जीवघेणा हल्ला

26
0

आशाताई बच्छाव

1001578018.jpg

अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –केडगावात पत्रकारावर जीवघेणा हल्ला
केडगाव परिसरात एका अपार्टमेंटमध्ये पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.६ ) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केडगाव उपनगरातील एकनाथ नगर परिसरात नाथकृपा अपार्टमेंटमध्ये पत्रकार अरुण नवथर हे बसले असता तिथे एक अज्ञात व्यक्ती संरक्षण भिंतीवरून उडी मारून अपार्टमेंटमध्ये आला. त्यावेळी नवथर त्याला म्हणाले की, तुम्ही अपार्टमेंटमध्ये आत उडी का मारली, असे विचारले. त्याचा राग आल्याने फिर्यादीला शिवीगाळ करत जबर मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस विश्वास गाजरे हे करत आहेत.

Previous articleशिंदखेडा येथे दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव बसविणे मोफत शिबीराचे उद्या आयोजन
Next articleवनसगाव येथील गणेश जोशी गुरु ज्योतिष भूषण पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here