आशाताई बच्छाव
शिंदखेडा येथे दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव बसविणे मोफत शिबीराचे उद्या आयोजन
(विरदेल/शिंदखेडा प्रतिनिधी)
(-राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा तालुक्याचे आमदार मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद धुळे व व एस. आर. ट्रस्ट (मध्य प्रदेश ) यांच्या संयुक्त विद्यमाने ङ्गङ्घदिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात -पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ (ऑन दि स्पॉट) मोफत वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ०८/०६/ २०२५ रविवार रोजी सकाळी – १०,००
वाजेपासूनपंचायत समिती, शिंदखेडायेथे सदरचे शिबिर होणार आहे. तरी शिंदखेडा शहरातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी यांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा. सदर कार्यक्रमास शिंदखेडा शहरातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी यांनी उपस्थित रहावे असे दिपक बागल (तालुकाध्यक्ष, दोंडाईचा
ग्रामीण, शिंदखेडा) मोतिलाल वाकडे तालुकाध्यक्ष, शिंदखेडा ग्रामीण, शिंदखेडा) संजयकुमार महाजन (शहराध्यक्ष, शिंदखेडा शहर) यांनी आवाहन केले आहे. आवश्यक कागदपत्रे. १) आधार कार्ड. २) रेशन कार्ड. ३) वैद्यकीय प्रमाणपत्र. (यू.डी. आयडी कार्ड.) मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती सोबत आणावीत असे आवाहन करण्यात आलेले आहे