आशाताई बच्छाव
पुणे जिल्हा व राज्यातील बाराबलुतेदार ओबीसी तील व्यावसायिक व दुकानदार यांचे कर्जमाफी करण्या यावी…!!
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
पुणे जिल्हा व महाराष्ट्रात अनेक बाराबलूतेदार ओबीसी व्यवसाय छोटे दुकानदार वर्ग असून
अनेकांनी सरकारी योजनेतून कर्ज घेतले असून यास राज्य सरकार इतर मागासवर्गीय महामंडळ कर्ज माफी देण्यात यावी या बाबत मागणी भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर, आळंदी नगरपरिषद नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर यांनी इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक सदाशिव पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली.
राज्यात अनेक ओबीसी बलुतेदार कर्जदारांना अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वसुलीसाठी त्रास दिला जात आहे असून
जप्तीचे आदेश सुद्धा काढण्यात आले आहेत,
बाराबलुतेदार, ओबीसी वर्गाला होणारा त्रास हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत माहिती देऊन त्यांना कोविड अधी वाटप करण्यात आले त्यांचे कर्ज माफी कारण्याचे विनंती करण्यात यावी मागणी करणार असल्याचे विशाल वाळुंजकर यांनी सांगितले…!
राज्यात अनेक व्यावसायिक दुकानदार यांचे कोविड आणि मंदी व शेतीतील नुकसान, पाऊस दुष्काळी आपत्कालीन परिस्थितीमुळे कर्ज फेडण्यास अडचणी येत आहे अनेक जण हातावर पोट भरून काम करून सुद्धा घर चालवणे जात नाही यांची घरातील परिस्थिती चिंताजनक असून तरी इतर मागासवर्गीय व बाराबलुतेदार समाजातील गोर गरीब राज्यातील कर्जदारांची कर्ज माफी करून त्यांना दिलासा देण्यात यावा अशी निवेदनात भाजपा कडून मागणी केली आहे
यावेळी विशाल सातपुते राजू कानडे मीनाक्षी गायकवाड जयश्री नवगिरे उपस्थित होते