Home बुलढाणा चार जूनला इसरूळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या तेरवीचा कार्यक्रम ! शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर...

चार जूनला इसरूळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या तेरवीचा कार्यक्रम ! शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांचे आंदोलन सोशल मीडियावर गाजतेय….

41
0

आशाताई बच्छाव

1001563250.jpg

चार जूनला इसरूळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या तेरवीचा कार्यक्रम ! शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांचे आंदोलन सोशल मीडियावर गाजतेय….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी एक आगळंवेगळं आणि टोकाचं आंदोलन हाती घेतलं आहे. त्यांनी 4 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजता इसरूळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या “तेरवी”चा कार्यक्रम आयोजित केला असून, त्यासाठी “गोड जेवणाचं” ही आयोजन करण्यात आलं आहे.

भुतेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली असून, हा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून आयोजित केल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “खडकपूर्णा प्रकल्पातून अवैधरितीने वाळू उपसा सुरू असताना, वारंवार निवेदने देऊनही प्रशासन काहीच कारवाई करत नाही. रस्त्यांची अवस्था बिकट आहे, मुलांना शाळेत जाणं अवघड झालं आहे. महसूल कर्मचाऱ्यांनाही दहशतीखाली काम करावं लागतं.” पुढे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर थेट आरोप करत लिहिलं की, “जिल्हाधिकारी झोपेत आहेत. जर त्यांनी ठरवलं, तर कुणीही वाळूचा एक कणही हलवू शकत नाही. पण प्रत्यक्षात मात्र त्यांचे आदेश पाळण्याची कोणालाच भीती नाही. अशा निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांपेक्षा नसलेलेच बरे.”
या घोषणेमुळे संतोष भुतेकर यांच्या पोस्टवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काही जण या आंदोलनाचं समर्थन करत आहेत, तर काहींनी अशी भाषा वापरणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here