आशाताई बच्छाव
साकोलीत सुरू झाला रेती “स्टॉक एक्सचेंज” मेळावा
२०१६ तील जुन्या व तयार घरकुलांची यादी दाखवून वाळूंची विक्री व भरपूर साठा जमा • सरपंचांचे भंडा-यात जाऊन जिल्हाधिकारींना दाखल केली तक्रार
संजीव भांबोरे
भंडारा -साकोलीत नुकतेच आमदार नाना पटोले यांनी क्षेत्रातील गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू प्राप्त व्हावी यासाठी या सुविधेचा एसडीओ व तहसीलदार यांचे उपस्थितीत शुभारंभ केला. पण प्रकार हा सुरू झाला की, नाव घरकुल लाभार्थ्यांचे ते सुद्धा २०१६ यादींचे आणि वाळू जमा होत आहे “स्टॉक” गोडाऊनला परत विक्रीही सुरू. याची संपूर्ण चौकशी व पडताळणी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी उमरीचे सरपंच यशवंत कापगते यांनी आज मंगळवार ०३ जून ला भंडारा गाठून यांची तक्रार थेट जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांकडे केली आहे.
सध्या हा रेतीघाट उमरी लवारी चुलबंद नदीघाटावर सुरू असून तेथे तीन तहसिल महसुल विभागाचे कर्मचारी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा संतापजनक प्रकार लक्षात येताच उमरीचे सरपंच यशवंत कापगते यांनी मंगळवारी याबाबत जिल्हाधिकारींना लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद की, मौजा उमरी येतील रेती घाटावरून घरकुलाच्या नावे रेतीचा होत असलेला अपहार थांबविण्याबाबद. आम्ही सर्व उमरी ग्रामपंचायत सरपंच सदस्य तथा गावकरी या निवेदनाद्वारे आपणास कळविण्यात येत आहे की, उमरी ग्रामपंचायतला कोणतेही पूर्व सुचना न देता किवा ठराव न मागता आपण उमरी येथील रेतीघाट घरकुलांसाठी मुकरर केला आहे. या घाटावर तहसिलदारांनी नेमणूक केलेल्या प्रतिनिधीजवळ एकून साकोली तालुक्यातील ५१ गावातील ६ हजार घरकुल लाभार्थांची यादी आहे व त्यांना प्रति घरकुल ५ ब्रास असे एकून ३० हजार ब्रास रेती वाटप करण्याचे तहसीलदाराकडून देण्याचे निर्देश त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आले असून असे रेती वाटप सुरु आहे. या यादीतील ७०% टक्के नावे ही ६ ते ७ वर्षा पूर्वी पासून मंजूर असलेले व बांधकाम पूर्ण झालेले लाभार्थांची नावे आहेत. सदर लाभार्थाना रेती वाटप करण्याचा प्रश्नच येत नाही, तथापी या तालुक्यातील रेती माफिया हे यादीतील घरकुल लाभार्थाचे आधार कार्ड दाखवून बाहेर नेवून रेतीचा साठा करत आहेत व तसेच इतरत्र रेती खुल्लम खुल्ला विकत आहेत तरी आम्ही विनंती करतो की, त्वरित दर दिवसी १५० ते २०० ब्रास जात असलेली रेती ज्या घरकुलांसाठी वितरीत करण्यात येत असलेली रेती त्याच घरकुला पर्यंत पोहचत आहे की नाही याची तपासणी ग्रामसेवक तथा तेथील तलाठी यांच्या मार्फत करण्यात यावी ट्रॅक्टर धारकांनी हा रेतीचा अपहार सुरु आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. असे स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर केले आहे.
सदर सुरू असलेल्या उमरी रेती घाटात एकोडी पासून ट्रैक्टर लागलेले आहेत. यामध्ये ती नेत असलेली वाळू ही आजच्या तारखेत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना खरंच पोहचते की, काही २०१६ – १७ मधील बांधकाम पूर्ण झालेल्या काही घरकुल लाभार्थ्यांचे आधार कार्ड लाऊन या शासकीय महसुली वाळूचा कुठेतरी निर्जनस्थळी मोकळ्या मैदानावर “स्टॉक एक्सचेंज फॉर डम्प यार्ड” मेळावा तर भरविण्यात येत नाही अशी दाट शंका उमरीवासीयांनी व्यक्त केली असून यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी ग्रामपंचायत उमरीतील पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.
• यावर उमरी सरपंच यशवंत कापगते म्हणतात की –
“येथे निदर्शनास आले की, काही २०१६ चे बांधकाम पूर्ण झालेले घरकुल लाभार्थ्यांचे आधार कार्ड लावून त्यांचे नावावर रेती नेत त्याची साठवणूक करून नंतर विकणे. या प्रकाराने आजचे गोरगरीब व निर्माणधीन आवास योजना लाभार्थ्यांची घोर फसवणूक व अन्याय होत आहे. म्हणूनच आम्ही थेट यांची जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडे तक्रार दाखल केली. याची पूर्ण पडताळणी व निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे”
प्रतिक्रिया
जिल्हाधिकारी भंडारा यांचे आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 0.5 ब्रांच रेती देण्याचे आदेश आहेत व याबाबत शासनाचे आदेश आहेत .परंतु घरकुल लाभार्थ्याची यादी ही ग्रामपंचायत विभागासाठी खंड विकास अधिकारी व नगरपरिषद क्षेत्रासाठी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या यादीनुसार लाभार्थ्याची निवड केली आहे .घरकुलांचे लाभार्थी निवडण्याची जबाबदारी पंचायत समिती आणि नगर परिषदेची आहे. महसूल प्रशासनाचे कार्य फक्त लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देणे आहे.
निलेश कदम
तहसीलदार साकोली