आशाताई बच्छाव
निधन वार्ता
द्वारकाबाई विनायकराव देशमुख
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ : येथून जवळच असलेल्या काटा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महानंदचे माजी अध्यक्ष वामनराव विनायकराव (अण्णा ) देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती द्वारकाबाई विनायकराव देशमुख यांचे ३१ मे रोजी
वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. त्यांचेवर काटा येथील त्यांचे शेतामध्ये १ जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
वाशिम पंचायत समितीचे सभापती तथा कंत्राटदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वीरेंद्र विनायकराव देशमुख यांच्या त्या आई होत. द्वारकाबाई यांचे पश्चात तीन मुले, सुना नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.