Home धाराशिव उमरगा दाबका हैदराबाद रोड येथे बलोनो गाडीने घेतला पेट एका चा मृत्यू...

उमरगा दाबका हैदराबाद रोड येथे बलोनो गाडीने घेतला पेट एका चा मृत्यू 2 जण बचावले . घातपाताचा संशय पोलिसांचा तपास सुरू …

582
0

आशाताई बच्छाव

1001555074.jpg

उमरगा दाबका हैदराबाद रोड येथे बलोनो गाडीने घेतला पेट एका चा मृत्यू 2 जण बचावले . घातपाताचा संशय पोलिसांचा तपास सुरू …धाराशिव, उमरगा प्रतिनिधी: उमरगा -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाबका गावा नजीक एका बलोनो कारला अचानक आग लागल्याने एकाचा जळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या गाडीतून प्रवास करणारे दोघेजण सुखरू बसवले आहेत .ही घटना शिर्डीहून दर्शन घेऊन हैद्राबादला परत जाताना घडली ,मयत व्यक्ती हैद्राबाद येथील शिक्षक असल्याची प्रार्थमिक माहिती समोर आली आहे .घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले .पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बलोनो कारने अचानक पेट घेतला, गाडीतील तिघांपैकी एका व्यक्तीला बाहेर न पडता आल्याने ,त्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला ,तर अन्य दोघे जण वेळीच गाडी बाहेर पडल्याने त्यांचे प्राण बचावले. *घातपाताचा संशय बळावला . या घटनेत एक जण मयत झाला असून, दोघेजण सुखरूप बचावल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला आहे .घटनेतून वाचलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत .बचावलेल्या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरगा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे .या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस आणि न्याय वैद्यक पथक अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Previous articleजालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद…
Next articleकामाचे ठिकाणी लैंगिक अत्याचार गंभीर स्वरूपाचा गुन्हा – अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here