Home वाशिम संशोधनासाठी संकेतला ETH झुरिच, स्वित्झर्लंड , विद्यापीठाची शिष्यवृत्ती

संशोधनासाठी संकेतला ETH झुरिच, स्वित्झर्लंड , विद्यापीठाची शिष्यवृत्ती

50
0

आशाताई बच्छाव

1001551026.jpg

संशोधनासाठी संकेतला ETH झुरिच, स्वित्झर्लंड , विद्यापीठाची शिष्यवृत्ती
भारतीय विज्ञान संस्थेत भूकंप अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.

वाशीम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ ः स्थानिक लाखा ळा येथील चि. संकेत नारायण बाजड या विद्यार्थ्याला भूकंप अभियांत्रिकी (सिस्मॉलॉजी) या विषयात पीएच.डी. करण्यासाठी जागतिक दर्जाची स्वित्झर्लंडमधील झुरिच विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी पात्र ठरला आहे. विशेष म्हणजे तो आधीच भारतीय विज्ञान संस्थेत बंगलोर अशा महत्त्वाच्या ठिकाणी संशोधन करत आहे.

जागतिक दर्जाची स्वित्झर्लंड येथील जागतिक क्रमवारीत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ETH झुरिच या विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी तो पात्र ठरला आहे. या अगोदर त्याला भारतात मानाची समजली जाणारी पीएमआरएफ (प्राइम मिनिस्टर रिसर्च फेलोशीप) चा मानकरी ठरलेला आहे. संकेतने यापूर्वी दोन वेळा अमेरिका येथे पेपर प्रेझेंटेशन/ अभ्यास दौरा पूर्ण केलेला आहे. आजपर्यंत त्याने एक रिसर्च पेपर प्रकाशित केलेला आहे, काही रिसर्च पेटेन्ट साठी सुद्धा सादर केले आहेत.
संकेत नारायण बाजड हा विद्यार्थी पीएचडी चा अभ्यासक असून सद्या तो संगणकीय भूकंपशास्त्र प्रयोगशाळा, पृथ्वी विज्ञान केंद्र, भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे संशोधन करत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तिच्या 2021 रँकिंगनुसार जगातील ती नं. 1ची संशोधन संस्था आहे. उल्लेखनीय म्हणजे माजी विद्यार्थ्यांमध्ये सुधा मूर्ती, डॉ. के. शिवन (इस्रोचे अध्यक्ष), व्हीके आत्रे आणि बरेच आहेत. तर डॉ.सी.व्ही.रामन, सी.एन.आर.राव आणि सतीश धवन यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी संस्थेला प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
संकेतने दहावीपर्यंतचे शिक्षण एस.एम.सी. इंग्लिश स्कूल वाशीम येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने राजस्थान महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. बारावीनंतर पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग बी.टेक. मध्ये प्रवेश घेतला. पदवीच्या तिसर्‍या वर्षातच त्याने गेट ह्या उच्च शिक्षण प्रवेशासाठी महत्त्वाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सन 2021 मध्ये त्याने गेट दिली आणि सिव्हिल इंजिनिअरिंग श्रेणीमध्ये 975 वे अखिल भारतीय रँक मिळवले. यासाठी त्या काळात करोनाचे संकट त्याच्यासाठी वरदान ठरले आणि गेट च्या तयारीवर लक्ष केंद्रीत करण्यास संकेतला पुरेसा वेळ मिळाला. त्यामुळे भारतीय विज्ञान संस्थेत प्रवेश मिळविण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला.

संकेतचा मोठा भाऊ केतन हा सुद्धा आयआयटी पवई मुंबई या नामांकित संस्थेतून पीएच.डी. करत आहे. त्याचे वडील नारायणराव बाजड हे इंजिनिअर असून, नावली ता. रिसोड अशा अगदी ग्रामीण भागातून येऊन उच्चशिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेणार्‍या या दोन्ही भावंडांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय आई-वडिलांना आणि गुरूजनांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here