आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील मोर्शि येथील नगरपरिषद ने मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास: रस्त्यावरील खांबावर असलेले बॅनर हटले सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्न. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मुख्य रस्त्यावर विद्रूपीकरण्यात भर घालणारा राजकीय शुभेच्छा कार्यक्रमाचे तसेच वाढदिवसाचे बॅनर दैनिक युवा मराठा वृत्त संकलनाने प्रसिद्ध दिली होती व त्याचा शासनाने धसका घेतला. शहराच्या मुख्य रस्त्यावर त्याचबरोबर धार्मिक स्थळावर सुद्धा मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते त्यामुळे शहराचे विद्रूपिकरण होत होते तसेच वाहतुकीलाही अथळा निर्माण होत होता याबाबतची वृत्त प्रकाशित झाले होते .शहरातील बॅनर काढण्याची मोहीम नगर परिषद मोर्शि.च्या वतीने काढण्यात आले आहे.दी .२७ रोजी स्वच्छता विभागाकडून ही मोहीम सुरू झाल्याने मोर्शी शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले आहे .तसेच स्थानिक नगरपरिषद प्रशासन कडून जाहिरात होर्डिंग लावल्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने शहराच्या विविध भागात वाढदिवसाचे व शिकविणेचे वर्गाचे बॅनर मोठ्या प्रमाणात झळकल्या होते .रस्त्यावरच हे होर्डिंग, बॅनर लावण्यात येत असल्याने शहराचे विद्युतीकरण झाले होते रस्ता दुभाजकावर अनेक बॅनर लावले जात असल्याने वाहन चालवताना त्याकडे लक्ष जात होते पर्यायाने अपघात होण्याची शक्यता बळावली होती. अनेकदा मोठी पोस्टर लागल्यास व त्यावर अनेक फोटो असल्यास ते पाहण्यासाठी नागरिक रस्त्यावरच थांबत होते पर्यायी वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता अनेकदा वादळ तसेच वाऱ्यामुळे रस्त्यावर लावलेले खेड्यात उडत होत्या त्यामुळे सुद्धा अपघात होण्याची शक्यता वाढली होती. मोर्शी शहरातील जस्तंभचौक तसेच तिथे असलेल्या मंदिरावरही फ्लेक्स लावले जात असल्याने मोर्शी शहर हे बॅनरबाजीमुळे गुदमरून गेले होते . मोर्शी नगरपालिकेच्या माध्यमातून देखील या अनाधिकृत बॅनर पोस्टरवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नव्हती .मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबावरील फलक लावले जातात अशा प्रकारचे बॅनर लावण्यामध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व स्वयं गोष्टी समाजसेवक आघाडीवर असल्याचे दिसून आले अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी नगरपालिकेने शहरातील काही ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी बॅनर लावण्यास परवानगी देण्याची योजना सुरू करणे आवश्यक आहे .शहराचे सौंदर्यकरण खराब करणारे बॅनर नकोच शहरात विविध सौंदर्य स्थळ असली तरी ती या जाहिरातीच्या होर्डिंग बॅनर मुळे झाकली जात होते त्यामुळे शहराचे सौंदर्यकरण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा कोणताच फायदा होत नसल्याचे नगरपरिषद च्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी अनाधिकृत बॅनर , फ्लेक्स, होर्डिंग काढण्यास सुरुवात केली त्यामुळे शहरातील रस्ते बॅनर मुक्त होत असून सर्वसामान्यांनी त्याचे स्वागत केले आहे.