Home बुलढाणा स्वच्छतेच्या कामाकडे वानखेड ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

स्वच्छतेच्या कामाकडे वानखेड ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

28
0

आशाताई बच्छाव

1001533866.jpg

स्वच्छतेच्या कामाकडे वानखेड ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
बुलढाणा – विशेष प्रतिनिधी 
स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ही बाब पूर्णत्वास जायला हवी होती. मात्र या मिशनचा रेकॉर्ड मेंटेन करण्यातच वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. परिस्थितीवर ग्रामपंचायत सातत्याने लक्ष देत आहे. यात कुठलीही शंका नाही. मात्र गावातील किती नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला या नियोजनाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
स्वप्निल देशमुख
वानखेड : संग्रामपूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून वानखेडचे नाव घेतले जाते. मात्र विद्यमान स्थितीत गावातील मूलभूत समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. ज्या प्रकारे नाली व रस्त्याच्या बांधकामाकडे लक्ष दिले जाते तसेच लक्ष स्वच्छतेच्या कामाकडेही देण्यात यावे अशी चर्चा गावात सुरु आहे. नाली स्वच्छतेच्या कामाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या जीवालाही धोका उत्पन्न होऊ शकतो.
गावात मोठ्या नाल्यासह अनेक लहान नाल्यांचा समावेश आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी गावात स्वच्छता केली जाते, यात दुमत नाही. परंतु नेहमीच्या जागी स्वच्छता करुन काही नाल्यांमधील गाळ उपसण्यात येत नाही.
याबाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे सपेशल दुर्लक्ष दिसून येत आहे.
स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ही बाब पूर्णत्वास जायला हवी होती. मात्र या मिशनचा रेकॉर्ड मेंटेन करण्यातच वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
परिस्थितीवर ग्रामपंचायत सातत्याने लक्ष देत आहे. यात कुठलीही शंका नाही. मात्र गावातील किती नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला या नियोजनाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. गावात जिथे रस्ता आहे तिथे नाली नाही आणि जिथे नाल्यांची अत्यंत आवश्यकता आहे तिथे काम हाती घेण्यात आले नाही.
त्यामुळे अंतर्गत रस्त्याहून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. पावसाळ्यात ही समस्या अधिकच बिकट बनते. घाणीने तुंबलेल्या नाल्यांमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

ज्या वॉर्डांमध्ये नाल्या नाहीत अशा ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. काही नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला नाही. ज्या ठिकाणी पाणी साचले असते तिथे विषारी श्वापदांचाही धोका कायम असतो. या संदर्भात गावातील तीर्थक्षेत्र जगदंबा माता मंदिर वानखेड मेन रोड अशी स्थिती पहायला मिळत आहे. पाणी निघण्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात शिरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. लोकसंख्येच्या मानाने पदाधिकाऱ्यांची जबाबदारीही मोठी आहे. या समस्येकडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी लक्ष देवून नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वानखेड परिसरात स्वच्छता,पाणी, विद्युत पुरवठा,आरोग्य, रस्ते अशा अनेक समस्यांना सध्या नागरिक त्रासले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारे या विषयी मोहीम राबवली जात नाही. रस्ता, अतिक्रमण,घाणी संदर्भात अनेक वेळा तोंडी तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत कुठलीच कारवाई होत नसल्याने शेवटी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागणार आहे.”

स्वप्निलबाप्पू देशमुख ( वानखेड )–पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here