Home जालना वरुड बुद्रुक ग्रामसंसद कार्यालया कडून गावात डस्टबिनचे नागरिकांना वाटप – सरपंच इंदुबाई...

वरुड बुद्रुक ग्रामसंसद कार्यालया कडून गावात डस्टबिनचे नागरिकांना वाटप – सरपंच इंदुबाई बावस्कर

24
0

आशाताई बच्छाव

1001533796.jpg

वरुड बुद्रुक ग्रामसंसद कार्यालया कडून गावात डस्टबिनचे नागरिकांना वाटप – सरपंच इंदुबाई बावस्कर

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील ग्रामपंचायत येथे 450 डस्टबिन चे वाटप करण्यात आले आहे ग्रामपंचायतने पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे या ग्रामस्थांमध्ये सर्व आता घरातील केर कचरा बाहेर न फेकता तो कचरा डस्टबिन मध्ये टाकून आपले गाव व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी केले आहे. संख्या जवळपास चार हजाराच्या घरात आहे यापुढे महिलांना घरातील कचरा टाकण्यासाठी कुठलाही साधन नसल्याने हा कचरा गावातील जागेवर फेकला जायचा त्यामुळे गावात नेहमी दुर्गंधी व आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या त्याबाबत ग्रामस्थांनी यावर काहीतरी तोडगा करण्यात यावा म्हणून ग्रामपंचायतीकडे मागणी लावून धरली होती त्यानुसार मागणी लक्षात घेता घरोघरी डस्टबिन वाटण्याचा निर्णय घेतला शुक्रवारी जवळपास 450 डस्टबिन चे वाटप ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आले. डस्टबिन घेण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली होती. ग्रामस्थांनी आता घरातील केरकचरा व घाण उघड्यावर न टाकता डस्टबिन मध्येच टाकावे जेणेकरून गाव स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी मदत होईल ग्रामपंचायत करीत असून समाधान व्यक्त करीत आहेत यावेळी सरपंच इंदुबाई बावस्कर, भाजप तालुका उपाध्यक्ष सांडू वाघ, दादा वाघ ,योगेश वाघ, रामकृष्ण वाघ, प्रकाश धनराज आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here