आशाताई बच्छाव
कोब्रा कमांडोचा चिरंजीव “आरव” याची सैनिक शाळेत यशस्वी वाटचाल
(तुमसर नगरीसाठी अभिमानाचा क्षण, प्रेरणादायी यश )
संजीव भांबोरे
भंडारा_कोब्रा कमांडो म्हणून देशसेवा करणारे अमोल उपेंद्र वासनिक व सौ.हेमा अमोल वासनिक यांचा चिरंजीव ” आरव ” याने इयत्ता ५ वीतील सैनिक स्कूल चंद्रपूरची प्रवेश परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली असून, लवकरच तो इयत्ता ६ वी मध्ये सैनिकी शाळेत प्रवेश घेणार आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण वासनिक कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंदाचे व अभिमानाचे भाव म्हटले आहेत. “आरवच्या” यशाचे श्रेय त्याया अभ्यासु वृत्तीला,केला कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाला आणि विशेषत: देशासाठी कार्यरत असलेल्या त्याच्या वडिलांच्या प्रेरणेला जाते. सैनिक शाळेत प्रवेश मिळाल्याच्या बातमीने नातेवाईक ,शेजारी आणि मित्र परिवारामध्ये आनंदाची लाट पसरली असून सर्वत्र “आरववर” अभिनंदनचा वर्षाव होतआहे. आरवच्या या यशामुळे तुमसर नगरीतून इतर विद्यार्थिनीही अशा प्रकारच्या शैक्षणिक व देशसेवेच्या वाटचालीकडे वळावे असा सकारात्मक पायंडा सुरू होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. बालवयातच आरवने साधलेल्या या यशाचा आदर्श घेऊन अनेक पालक व विद्यार्थी सैनिक शाळेच्या दिशेने पावले टाकतील असा विश्वास व्यक्त होत आहे .या त्याच्या यशाबद्दल सुगंधा राहुल डोंगरे, शिल्पा दीपक गडपायले, अर्चना परमानंद डोंगरे , उपेंद्र वासनिक, सिद्धार्थ डोंगरे,मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे .