Home भंडारा खरंच साकोलीत लोक जागृत तरी आहेत काय.? अन्यथा हे असे केले नसते

खरंच साकोलीत लोक जागृत तरी आहेत काय.? अन्यथा हे असे केले नसते

36
0

आशाताई बच्छाव

1001494000.jpg

खरंच साकोलीत लोक जागृत तरी आहेत काय.? अन्यथा हे असे केले नसते

माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी आणला प्रकार उघडकीस • केले जनतेला विनंती आवाहन •

संजीव भांबोरे
भंडारा : एकीकडे मुख्य शहर गणेश वार्ड ते तलाव प्रभागातील गावतलावाचे सौंदर्यीकरणाचे सुसज्जीत कार्य प्रगतीपथावर आहे. तर दुसरीकडे काही बेजबाबदार जनता तलाव बायपास मार्गावर अन्यत्र कचरा आणि घरातील खरकटे अन्न आणून टाकतात. यावर येथील जनता किती जागरूक आहेत याची प्रचिती नुकतीच घडलेली असून माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी हा संतापजनक प्रकार “प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ” जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांच्या लक्षात आणून दिला. व जनतेला असे न करण्याचे विनंती आवाहन केले आहे.
ते म्हणाले की, जनतेचे कार्य काय असते.? निव्वळ पत्रकार व पोलीसच समस्या सोडविण्यासाठी वारंवार जनतेच्या मदतीला धावणार काय.? तर जनतेनेही जागरूक होऊन जनतेचे कर्तव्य काय हे समजून घेणे आज आवश्यक आहे. जनतेला याचे थोडेही भान नाही की, आपल्याच घरासमोरून सुसज्ज तलाव सौंदर्याचे काम सुरू आहे. करोडो रुपये खर्च करून शासन जनतेसाठी हिरव्या वातावरणात एक सौंदर्यात भर घालून हा परीसर प्रकाशझोत आणित आहेत. परंतु काही बेजबाबदार जनतेच्या अश्या या उर्मट वागण्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हे जनतेला समजून घेणे आवश्यक आहे.
यावर त्यांनी समस्त जनतेला विनंती आवाहन केले आहे की, सर्वांनी आपले शहर स्वच्छ कसे राहील व आपण जनतेचे काय कर्तव्यदक्ष कार्य आहे हे समजून घेतले पाहिजे. आपणच घाण करू तर इतरही घाण करतील म्हणून आपला वार्डात, आपल्या घरासमोर स्वच्छता कशी कायम राहील याची काळजी घ्यावी व सार्वजनिक सौंदर्य निर्माण स्थळांवर कुणीही घाण कचरा आणून टाकू नये असे आवाहन “साकोली मिडीया” द्वारे माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी समस्त साकोली सेंदूरवाफा शहरातील जनतेला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here