आशाताई बच्छाव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश!
नवी दिल्ली वृत्तसंस्था: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणूका जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या तात्काळ घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला दिले आहेत.
निवडणूका बाबत ताबडतोब अधिसूचना काढण्यात येऊन चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणूका घेण्यात याव्यात असे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला दिले आहेत.