आशाताई बच्छाव
माहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह गारा व हलक्या स्वरूपाचा पाऊस
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील माहोरा परीसरात दिनांक ५ मे सोमवार दुपारी अचानक आकाशात ढगळ वातावरण तयार झाले. २ वाजेच्या सुमारास वादळी वारा सुरु झाला आणि गारा पडू लागल्या आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची थोडी तारंबळ उडाली गारांमुळे भाजीपाला आणि मिर्ची लागवडीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
तसेच शेतकऱ्यांनी वारा आणि विजांपासून सावधगिरी बाळगावी झाडांखाली थांबू नये झाडावर वीज पडण्याची जास्त शक्याता असते. यादिवसात अवकाळी पाऊस असतात त्यामूळे शक्यतो घरांचा सहारा घ्यावा.