Home उतर महाराष्ट्र दोंडाईचा ते साहूर रस्त्याच्या कामाला वेग शिवसेना (उबाठा) गटाच्या आंदोलनाचा परिणामः शिंगाडा...

दोंडाईचा ते साहूर रस्त्याच्या कामाला वेग शिवसेना (उबाठा) गटाच्या आंदोलनाचा परिणामः शिंगाडा मोर्चा तात्पुरता स्थगित

182

आशाताई बच्छाव

1001470830.jpg

दोंडाईचा ते साहूर रस्त्याच्या कामाला वेग

शिवसेना (उबाठा) गटाच्या आंदोलनाचा परिणामः शिंगाडा मोर्चा तात्पुरता स्थगित
(विरदेल प्रतिनिधी- राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते साहूर ( दाऊळ, झोतवाडे व शेंदवाडे मार्गे) रस्त्यांच्या कामाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ५ मे रोजी शिंगाडा मोर्चा आयोजित केला होता. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मनिष वाघ यांनी रस्त्याच्या कामाला वेग दिला आहे. यामुळे शिवसेना उबाठाने शिंगाडा मोर्चा तात्पुरता स्थगित केला आहे.

शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख

शानाभाऊ सोनवणे, नरेंद्र भामरे, शैलेश सोनार, लोटन देसले आणि भूषण सोनवणे यांनी २२ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मनिष वाघ यांना निवेदन सादर केले होते. या निवेदनात दोंडाईचा, दाऊळ, झोटवाडे, शेंदवाडे व साहुर या रस्त्याचे काम मंजूर असूनही ठेके दाराच्या व प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे काम रखडल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या मार्गावर अपघातांमुळे अनेकांचे प्राण गेले असून, अनेकांना गंभीर दुखापती झाल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात

आला. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, त्यांना काळ्या यादीत टाकावे आणि काम दुसऱ्या ठेकेदाराला सोपवावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या (उबाठा) इशाऱ्यामुळे प्रशासनाने काम सुरू केले असून, सध्या दोंडाईचा ते साहूर (बाऊळ, झोटवाडे, शेंदवाडे मार्गे) रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. त्यानुसार शानाभाऊ सोनवणे यांनी स्वतः या रस्त्याच्या कामाची पाहणी करून ठेकेदार व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मे अखेरपर्यंत काम पूर्ण होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. काम वेळेत पूर्ण करून कामात गुणवत्ता राखण्याची सूचना सोनवणे यांनी बांधकाम विभागाला केली आहे. बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामास चालना दिल्याने शिवसेना उबाठाने शिंगाडा मोचां तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याच माहिती शानाभाऊ सोनवणे व नरेंद्र भामरे यांनी दिली.

Previous articleयंदा 11 वीचे प्रवेश होणार केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने
Next articleकेशवनगर येथे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते मनपा शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.