आशाताई बच्छाव
युवा मराठा न्यूज नेटवर्कच्या बातमीच्या दणक्याने पळसखेडा पिंपळे येथील उपोषणार्थीच्या मागण्या मान्य करून उपोषण मागे
युवा मराठा न्यूज रिपोर्टर गजेंद्र लोखंडे पाटील भोकरदन
भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे चालू असलेल्या उपोषणाची बातमी आज प्रकाशित होताच उपोषणार्थीच्या मागण्या गटविकास अधिकारी ग्रामसेवक यांनी मान्य करून उपोषणार्थींनी आपले उपोषण मागे घेतले आहे पळसखेडा पिंपळे या गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनास वारंवार विनंती करून पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे दोन एप्रिल पासून मौजे पळसखेडा पिंपळ या ठिकाणी उपोषणास बसले होते दोन दिवस या उपोषणाकडे शासकीय अथवा लोकप्रतिने पाठ फिरवल्यामुळे युवा मराठा न्यू नेटवर्क चे रिपोर्टर लोखंडे पाटील यांनी उपोषणा स्थळी जाऊन उपोषणार्थीची भेट घेऊन युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर चैनल साठी बातमी पाठवून प्रसारित करण्यात आली होती त्या बातमीला वाचा फोडण्याचे काम केलं असून लगेच पळसखेडा पिंपळे येथील सुरू उपोषण स्थळी पंचायत समिती भोकरदन चे गट विकास अधिकारी महेंद्रजी सावळे साहेब तसेच ग्रामसेवक यांनी भेट देऊन उपोषणाअर्थीच्या मागण्या मान्य करून एक ते दोन दिवसात टँकरद्वारे पाणी वितरित करण्यात येईल व पुढील सोमवारपासून आपल्या गावात कॉलनीला नेहमीप्रमाणे पाणी सोडले जाईल असे लेखी आश्वासन दिले त्या आश्वासनाच्या व गटविकास अधिकारी यांच्या शब्दाला मान देऊन आज चालू असलेले उपोषण साबळे साहेब यांच्या हस्ते पाणी घेऊन दीपक जाधव व संदीप शिरसाठ यांनी उपोषण स्थगित केले.