आशाताई बच्छाव
52 व्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पंकज वानखेडे यांचा सन्मान
सोलापूर येथे आयोजित भंडारा विभागाच्या “”जबरी”” नाट्यप्रयोग प्राथमिक फेरीत नेपथ्य व रंगमंच
व्यवस्थेकरिता द्वितीय क्रमांक
संजीव भांबोरे
भंडारा —महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ … ५२ व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धा सन २०२४- भ
२०२५….सोलापूर येथे आयोजित भंडारा विभागाच्या “”जबरी “” नाट्य प्रयोग प्राथमिक फेरीत नेपथ्य व रंगमंच व्यवस्थे करिता द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल ०१ मे २०२५ रोज गुरुवार सकाळी ०७:०० वाजता विभागीय कार्यालय येथे ध्वजारोहण प्रसंगी महाराष्ट्र दिन , मराठी राज भाषा दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून अमरावती नागपूर प्रदेश नियंत्रण समिती क्र. ०३ उप महा व्यवस्थापक श्रीकांत गभणे , भंडारा विभागाचे विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर , भंडारा विभागाचे उपयंत्र अभियंता संदीप खवडे ,यांच्या हस्ते विभागीय कार्यशाळा कर्मचारी पंकज दिलीपराव वानखेडे यांना सन्मान चिन्ह… सन्मानपत्र… पुष्पगुच्छ ने सन्मानित करून गौरव करण्यात आला.
प्रसंगी विभागीय कामगार अधिकारी पराग शंभरकर , विभागीय वाहतूक अधिकारी शितल शिरसाट , विभागीय वाहतूक अधीक्षक प्रवीण गोल्हर सर , विभागीय आस्थापना पर्यवेक्षक गायत्री फुंडे , विभागीय सांख्यिकी अधिकारी राकेश तलमले , विभागीय अभियंता (स्था.) कटरे , सुरक्षा व दक्षता अधिकारी मोहन कानफाडे , सहाय्यक सुरक्षा निरीक्षक इंगोले , सहाय्यक सुरक्षा निरीक्षक अजिंक्य रहांगडाले , सहाय्यक यंत्र अभियंता ईश्वर धुर्वें , विभागीय कार्यशाळा अधीक्षक महेश राखडे , विभागीय भांडार अधिकारी लिंकेश नागपुरे , भांडार पर्यवेक्षक गौरव क्षिरसागर , सुरक्षा विभागाचे संपूर्ण सुरक्षा रक्षक कर्मचारी , आगार , कार्यालय , भांडार शाखा , विभागीय कार्यशाळेतील संपूर्ण कर्मचारी बंधु – भगिनी उपस्थित होते.