आशाताई बच्छाव
माहुरवेश मैदानात गुंड प्रवृत्तींचा धुमाकूळ; नागरीक त्रस्त
लहुजी वस्ताद साळवे आखाडा व व्यायाम क्रीडा मंडळाचे निवेदन
गुंडांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना मागणी
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ – स्थानिक शुक्रवारपेठ भागातील माहुरवेश मैदानात दिवसेंदिवस गुंडप्रवृत्तीच्या लोकांचा उपद्रव वाढला असून त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. मैदानात अनैतीक वर्तन करण्यासोबतच मारामारीच्या प्रकारातही वाढ झाली असून यामुळे परिसरातील नागरीकांसह महिला व मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकाराला पायबंद घालुन जनतेला भयमुक्त करण्याच्या मागणीसाठी लहुजी वस्ताद साळवे आखाडा व व्यायाम क्रीडा मंडळाच्या वतीने सोमवार, २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, माहुरवेश मैदानात बाहेरून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुटखा, गांजा, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्रांसह गोंधळ घालणे, स्थानिक नागरिकांना धमकावणे आणि मारहाण करणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. या गुन्हेगारी वर्तनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणावरुन जाणार्या महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढली आहेत. रात्रीच्या वेळी जोरजोरात गाणी वाजवली जातात, शिवीगाळ केली जाते आणि गोंधळ घालण्यात येतो. परिणामी, मैदानाचा सभ्य वापर धोक्यात आला आहे. त्यामुळे या गुंंड प्रवृत्तीवर तातडीने पायबंद घालावा. तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करावी. अन्यथा लहुजी वस्ताद साळवे आखाडा व व्यायाम क्रीडा मंडळाच्या वतीने व नागरीकांच्या सहभागातून व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर उमेश मोहळे, मुकेश गायकवाड, महादेव तुपसौंदर, अंबादास जोगदंड, विशाल वाणी, विशाल गायकवाड, मनिष साठे, महादेव कांबळे, भालचंद कुचेकर, गोपाल खडसे, शालीकराम खडसे, अजय इंगळे, भगत खडसे, अमर उफाडे, शाम उफाडे, मयुर कांबळे, राजु खडसे, ज्ञानेश्वर रणबावळे, रोहीत तुपसौंदर, विनायक गायकवाड, पल्लवी गायकवाड, सुधीर गवळी, निकेश गायकवाड, अनिल रणबावळे, शाकाल उफाडे, रवि खडसे, धिरज घुगे, इश्वर तांबेकर, प्रफुल्ल वाणी, शंकर शिंदे, नरेश हनवंते, शरद कांबळे, माला आपटे, विकाय गायकवाड, सिमा खडसे, मंदा शेलार, करण खंडारे, पुजा कांबळे, पुनम गायकवाड, बाली साठे, दगडाबाई गायकवाड, सतिश साठे, दुर्गा भालेराव, संतोष कांबळे, गजानन गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, परसराम गायकवाड, सुभाष कांबळे, दयानंद गायकवाड आदी महिला व पुरुषांच्या सह्या आहेत.