Home नाशिक पहलगाम येथील हिंदू पर्यटकांच्या अमानुष हत्याकांडाच्या निषेधार्थ देवळा येथे आज भाजपाच्या वतीने...

पहलगाम येथील हिंदू पर्यटकांच्या अमानुष हत्याकांडाच्या निषेधार्थ देवळा येथे आज भाजपाच्या वतीने काळया फिती लावून आंदोलन

234

आशाताई बच्छाव

1001438354.jpg

देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी: जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांच्या अमानुष हत्याकांडाचा निषेध व्यक्त करण्यासाठी देवळा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष किशोर आहेर व देवदारेश्वर संस्थांचे महंत गणेशानंदपुरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली काळ्याफिती लावून निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी देशभरातून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर अमानुषपणे गोळीबार केला. यात २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे संपूर्ण हिंदू धर्मावर आक्रमण झाल्याची भावना निर्माण झाली आहे. या हत्याकांडाचा देवळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या अतिरेक्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येऊन मृत पावलेल्या बांधवांना न्याय द्यावा. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार कुलकर्णी यांना देण्यात आले तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी पाच कंदील चौकात दंडाला काळया फिती बांधून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून निदर्शने केली.
यावेळी डॉ. रमणलाल सुराणा, अशोक आहेर, शिवाजी जाधव, समाधान महाजन, किशोर बोरसे, भाऊसाहेब चव्हाण, नाजीम तांबोळी, प्रतीक आहेर, शैलेश गुंजाळ, कमलेश आहेर, मयूर सोनवणे, मानस गुंजाळ, जगदीश शिंदे, सुभाष आहेर, रमेश पगार, चंद्रकांत भामरे, शंकर निकम, सुनील आहेर, योगेश खैरनार, समाधान सोनजे, देविदास वाघ, वैभव आहेर, शेखर आहेर, वैभव निकम, मिलिंद पवार, सुनील पवार, दत्तात्रेय आहेर, अनिल आहेर, किरण निकम, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleश्रीहरी बालाजी देवस्थान, चिमूर येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम संपन्न
Next article25 एप्रिलला सरपंच पदाची सोडत ; तहसिल निहाय वेळापत्रक जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.