Home उतर महाराष्ट्र सोनई महाविद्यालयाची जयभीम पदयात्रा संपन्न

सोनई महाविद्यालयाची जयभीम पदयात्रा संपन्न

87

आशाताई बच्छाव

1001415704.jpg

अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –सोनई महाविद्यालयाची जयभीम पदयात्रा
मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई, येथील विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती निमित्त सोनई बसस्थानक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक सोनई येथे जयभीम पदयात्रा काढण्यात आली होती. डॉ बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा प्रसार व्हावा आणि जनमानसात त्यांच्या विचारांचा जागर व्हावा या हेतूने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सोनई गावाचे सरपंच श्री धनंजय वाघ, श्री दादा वैरागर, ॲड. सुनील गडाख, श्री प्रकाश शेटे, पत्रकार श्री विनायक दरंदले, श्री सचिन पवार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ ज्ञानदेव झिने, डॉ अशोक तूवर, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ बाळासाहेब खेडकर, डॉ शरद औटी, वी. वी. अधिकारी प्रा. राहुल निपुंगे, रा. छा. से. मेजर डॉ सुरेश जाधव, डॉ संदीप खेडकर, डॉ शिवाजी दरंदले, प्रा. कावेरी ढोकणे आणि प्राधापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. पदयात्रेची सुरुवात सोनई बसस्थानकापासून झाली, आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ ज्ञानदेव झिने अभिवादनपर भाषणाने सांगता झाली . महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
विद्यार्थी तसेच गावातील अनेक ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली.

Previous articleअड्याळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
Next articleघाणखेडा (संगमपुर) येथे भैरवनाथ कृपेने अखंड हरिनाम सप्ताह व शिव महापुरण कथेला सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.