आशाताई बच्छाव
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –भारतरत्न डॉ. बाबासाहेब_आंबेडकर प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मा. मंत्री लोकनेते बाळासाहेब_थोरात, माजी.आ.डाॅ.सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून विश्वरत्न बाबासाहेब डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच, बहुजन शिक्षण संघाचे अध्यक्ष व माजी प्राचार्य बी. आर. कदम यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना थोरात साहेब म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करणे आणि त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर मा.नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, डाॅ.जयश्रीताई थोरात, उत्कर्षाताई रूपवते, हिरालाल पगडाल सर, तलवारे सर, गणपतराव सांगळे, सुधाकर रोहम, व्याख्याते प्रा. राहुल हांडे आदिंसह प्रतिष्ठानचे विविध पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते.






