आशाताई बच्छाव
धुळे नंदुरबार संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ -बऱ्याच वर्षापासून असलेली समस्या आज प्रत्यक्षात सुटल्याचे समाधान टिटाणेवासियांनी व्यक्त केले. तर बस थांब्याची मागणी पूर्ण झाली.राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक. नंदुरबार. बस थांबा टिटाणे फाटा करावा यासाठी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न शासन स्तरावर चालू होते परंतु पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कारवाई होत नव्हती. साक्री तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ज्यांनी ची ओळख आहे त्यांनी मात्र या प्रश्नाची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करून आणि राज्य परिवहन महामंडळाशी पत्रव्यवहार करून महामंडळाची परवानगी मिळवून आज प्रत्यक्ष अधिकृतपणे थांबा करण्यात सुरू करण्यात आला. या प्रश्नाची दखल स्थानिक म्हणून. रायरेश्वर कंट्रक्शन चे रोहित दहिते. व त्यांची. पत्नी. सौ. यामिनी रोहित दहिते . युवती सेना प्रमुख साक्री तालुका. यांनी. विशेष प्रयत्न व पाठपुरावा करून सौ आमदार मंजुळाताई. यांच्याकडून मंजूर करून घेतले आज दिनांक 7. एप्रिल रोजी अधिकृत बस थांबाचे लोकार्पण प्रवासी शेड याचे उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी उपस्थित पेटले, खोरी, आंबेमोहर, कुत्तरमारे, जामदे, टिटाणे. सरपंच सदस्य प्रतिनिधी आणि ज्येष्ठ.नागरिक तसेच. यामिनी ताई दहिते. युती सेना प्रमुख साक्री तालुका. रायरेश्वर चे रोहित दहिते. साक्री आगाराचे निरीक्षक. भामरे. तालुका शिवसेनेचे पदाधिकारी टिटाण्याचे माजी पोलीस पाटील तसेच माजी सरपंच प्रतिनिधी भिकन बागुल. उपसरपंच प्रतिनिधी. अमोल बागुल. ग्रामपंचायतचे सदस्य प्रतिनिधी. या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच आमदार ताईंनी संबंधितांना सूचना केली की प्रवासी बस शेड चांगल्या दर्जाचे व मोठे साइजचे बनवा व संबंधित आगार निरीक्षकांना. सर्व आगरांना सूचना करा . तसे लिखित आदेश द्या या थांब्यावर सर्व राज्य महामार्गाच्या बसेस थांबल्या पाहिजे कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये अशा सूचना संबंधितांना त्यांनी दिल्या. पुढे त्यांनी सांगितले की भविष्यासाठी या थांबाचा उपयोग या परिसराच्या विद्यार्थी मुलांना व वयोवृद्ध नागरिकांना व प्रवाशांना होईल मला आनंद आहे एवढ्या वर्षापासून असलेली प्रतीक्षा आज संपली व आज अधिकृतरित्या बस थांबा चे लोकार्पण संपन्न झाले.