
आशाताई बच्छाव
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज र-व: स्वरुप संप्रदाय तर्फे मोहाडीत गुढीपाडवा शोभायात्रा मोठ्या उत्साहात साजरी
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)भंडारा जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन ३० मार्चला सकाळी ७ ते दुपारी १ वाजे पर्यंत मोहाडी चौडेश्वरी माता मंदिर ते संपुर्ण मोहाडी शहरात संपन्न करण्यात आले.
यासाठी संप्रदायातील भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका, मोहाडी तालुका, तुमसर तालुका, पवनी तालुका, साकोली तालुका, लाखांदूर तालुका, लाखनी सातही तालुक्यातील* भक्तगण विविध झाकि सहीत वेगवेगळ्या पारंपारिक वेशभुषेत बहुसंख्येने उपस्थित झालेले होते.
यात कलधारी महिला, झेंडेधारी महीला-षुरुष सहभागी झालेले होते.यात विविध सातही तालुक्यातील
वेगवेगळ्या वेशभुषेत सहभागी झालेल्या होत्या.
विशेष म्हणजे गोंदिया वरुन आलेला तांडव नृत्य शोभायात्रेचे मुख्य आकर्षन केंद्र होते.
विशेष म्हणजे आदल्या दिवशी रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.
शोभायात्रा मिरवणुकीची सुरुवात रविवारला सकाळी चौडेश्वरी माता मंदिर मधुन माऊलीच्या पुजनाने सुरवात झाली.व संपुर्ण मोहाडी शहरात शोभायात्रा काढण्यात आली व चौडेश्वरी माता मंदिर येथे दुपारी शोभायात्रेचे समापन झाले.आरती नंतर मिरवणुकीतील सर्वांना महाप्रसाद नंतर शोभा यात्रेची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भंडारा जिल्हा सचिव होमराजजी वनवे व प्रास्ताविक भंडारा जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे साहेब यांनी पार पाडले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख पाहुणे माननीय प्राजक्ता बुराडे, तहसीलदार मोहाडी, बेलखेडे पोलीस निरीक्षक मोहाडी ,बाळू बारई अध्यक्ष चौंडेश्वरी माता मंदिर कमिटी मोहाडी, एकानंद समरीत उपाध्यक्ष ,हर्षल गायधने सहसचिव ,उमाशंकर बारई सदस्य ,मनोहरजी फऺदे नानिजधाम ऑडिटर, युवराजजी गिरीपुंजे प्रोटोकॉल अधिकारी, दिलीपजी साठवणे बालाघाट निरीक्षक, भंडारा जिल्हाध्यक्ष नितेशजी वंजारी, भंडारा महिला जिल्हा महिला अध्यक्षा वर्षाताई फऺदे ,भंडारा जिल्हा अध्यात्मिक प्रमुख मनोजजी तऱ्हेकर, भंडारा जिल्हा युवा बिनप्रमुख प्रशांत दादा कुंजेकर ,श्रीधरजी वैद्य , आशिषदादा बालपांडे ,अशोकजी मोटघरे ,गोपाल माकडे ,संपूर्ण भंडारा जिल्हा कमिटी, भंडारा जिल्ह्यातील सातही तालुका अध्यक्ष ,सर्व तालुका महिला अध्यक्षा, सर्व तालुका पदाधिकारी,जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, युवा युवती व संग्राम सैनिक, महिला ,गुरुबंधू भगिनी व बहुसंख्येने उपस्थित होत्या. हिंदू नववर्षाचे मोठे हर्षाउल्हासात स्वागत करण्यात आले.