
आशाताई बच्छाव
प्राचीन बारव तोडून शादीखाना बांधल्याची तक्रार केल्याने जबर मारहाण ! – 7 जणां विरुद्ध गुन्हा दाखल !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- लोणार प्राचीन बारव तोडून शादीखाना बांधल्याची तक्रार केल्याने तक्रारदाराला लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्या प्रकरणी 7 जणांविरुद्ध विविध कलमान्वये लोणार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सुत्रा नुसार, शहरांमध्ये प्राचीन काळापासून शासकीय जागेत अस्तित्वात असलेली बारव जमजम कॉलनी या परिसरात राहणाऱ्या नूर मोहमद खान ताजमीर खान यांनी तोडली आणि तेथे बेकायदेशीर शादीखानाचे बांधकाम केले. या बाबतची तक्रार मोहम्मद रिजवान उर्फ जड्डा मोहम्मद नासेर यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा, आयुक्त कार्यालय अमरावती व नगर परिषद मुख्याधिकारी लोणार
यांचेकडे दाखल केली. तक्रार दिल्याचा राग मनात धरून दिनांक २५ मार्च २०२५ रोजी दुपारी ४:१५ च्या सुमारास नुर मोहम्मद खान ताजमीर खान यांनी बेकायदेशीर जमाव जमवून सात जणांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मोहम्मद रिजवान उर्फ जड्डा मोहम्मद नासेर यांना बेदम मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली या मारहाणीत मोहम्मद रिजवान याला जबर मार लागला असून त्याच्या डोक्यात 9 टाके बसले आहेत. डाव्या हातात तीन रॉड टाकले गेले आहे सदर शास्त्र क्रिया ही घाटी हास्पिटल संभाजी नगर येथे करण्यात आली. छाती ला जबर मार बसला असल्या मुळे स्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्याला तात्काळ आय सी यु मध्ये ठेवण्यात आले. यावेळी आरोपी ने मारहाण सोडवण्यासाठी आलेल्या मोहम्मद रिजवान यांचे वडील मोहम्मद नासेर व भाऊ मोहम्मद सद्दाम हुसेन यांना सुध्दा मारहाण केली. या मारहाणीत मोहम्मद रिजवान उर्फ जड्डा मोहम्मद नासेर हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले. लोणार पोलिस स्टेशनला मोहम्मद सद्दाम हुसेन मोहम्मद नासेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (१) मोहम्मद खान ताजमीर खान (२) समीर खान ताजमीर खान (३) फैजान खान नूर मोहम्मद खान (४) ऐमल खान समीर खान (५) जायेद खान समीर खान (६) शोएब खान मुमताज खान (७) इम्रान खान मुमताज खान सर्व रा. लोणार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २०२३.१०९(१), ११८( १),१८९(२),१८९(४), १९०, १९१(२), १९१(३) १९२, ३५२, ३५१(२) नुसार गुन्हे दाखल केले पुढील तपास गणेश इंगोले सहा. पोलीस निरिक्षण लोणार हे करीत आहेत.