
आशाताई बच्छाव
देवकत्ते सरांचे शिव कोचीगं क्लासेसचे दोन विद्यार्थी नवोदय प्रवेशास पात्र
मुक्रमाबाद / प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे
जवाहर नवोदयच्या परीक्षा २०२५ चा निकाल मंगळवारी (दि. २५ मार्च) सायंकाळी जाहीर झाला. यात मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील जि.प. हायस्कूलची शिवांजली कपिलदेव सोनटक्के व श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी शिवप्रसाद जयसींग पांचाळ यांनी घवघवीत यश संपादन केले. हे दोन्ही विध्यार्थी मुक्रमाबाद येथील देवकत्ते सरांचे शिव कोचीगं क्लासेस चे विद्यार्थी होते सलग तिसऱ्या वर्षी हि दोन विद्यार्थी नवोदयास पात्र ठरले. त्या दोन्ही विध्यार्थ्यांचे देवकत्ते सरांनी सत्कार करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जवाहर नवोदयसाठी पात्र झाल्याने अनेक स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.